अनिकेत कोथळे खून खटल्याची 'या' तारखेपासून नियमित सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सांगली - संपूर्ण देशभरात गाजलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयात काही कागदपत्रांची पूर्तता केली. आता 19 नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी होईल. 

चोरीच्या संशयावरून सांगली शहर पोलिसांनी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना 6 नोव्हेंबर 2017 मध्ये अटक केली होती. पोलिस कोठडी घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी अनिकेतला बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 7 नोव्हेंबरला आंबोली येथे मृतदेह जाळला. याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कोथळे खून खटल्याची आता 19 नोव्हेंबरपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे वकील प्रमोद सुतार यांनी काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता सरकार पक्षातर्फे ऍड. उज्ज्वल निकम यांनी केली आहे. त्यामुळे आता खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. खटल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

आज सुनावणीवेळी ऍड. उज्ज्वल निकम यांच्यासह सांगली "सीआयडी'चे उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी, संशयितांचे वकील प्रमोद सुतार, सहायक कोणार्क पाटील उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aniket Kothale Murder Case Follow up