जनावरांच्या छावणीतील गैरव्यवहार प्रकरणी कोतवाल निलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

भावाने मजुर म्हणून काम केले आपला यामध्ये कसलाही संबंध नव्हता जर मी मजुर म्हणून काम केले असले तरी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या दृष्टीस पडले असते. मी स्वत मजुर म्हणून काम केले नाही व सहीही केली नाही. यामधील आर्थीक गैरव्यवहारात आपला कसलाही संबंध नाही. दबावामुळे मला कारवाईत बळीचा बकरा बनवून अन्याय केला.
- अजित मुलाणी, निलंबित कोतवाल

मंगळवेढा : श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या वतीने 2012 मध्ये चालविण्यात आलेल्या जनावराच्या छावणीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदारांनी गोणेवाडी येथील कोतवालास निलंबित करण्याचे आदेश दिले. कारखान्याच्या छावणी गैरव्यवहारात पहिला बळी कोतवालाचा दिला ही निलंबनाची कारवाई म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशी झाली. यातील अन्य बडे मासे व महसूलमधील जबाबदार अधिकारी अद्यापही मोकाट राहिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सप्टेंबर 2012 मध्ये जनावराच्या चाऱ्याची टंचाई लक्षात घेवून शासनाने जनावराच्या छावणी उघडण्यात आल्या. त्यामध्ये दामाजी कारखान्याच्या वतीने तालुक्यातील अनेक गावात छावण्या सुरू करण्यात आल्या. संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी जनावरांना चारा म्हणून ऊस पुरवण्यात आला. पुरवठा केलेला ऊस आणि डेपो जनावरांना पाणी व कडबाकटर सह अन्य बाबीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे नेते सिध्देश्‍वर हेंबाडे यांनी याबाबत विभागीय आयुक्तकडे चौकशीसाठी तक्रारी अर्ज दिला होता. आयुक्तांनी याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्फत 30 जानेवारी 16 अन्वये चौकशी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी यांनी 29 मार्च 16 याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या अहवालातील मुददा क्र 8 नुसार गोणेवाडी येथील कोतवाल अजित मुलाणी यांच्यावर कारवाई करण्याचे प्रास्तावित केले होते.

त्यानुसार तहसीलदारांनी दामाजी कारखान्याच्या चारा छावणीच्या आर्थीक गैरव्यवहारास जबाबदार धरुन निलंबित करण्यात आले. कारवाईबाबत उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांना याबाबत मोबाईल संपर्क साधला प्रतिसाद मिळाला नाही. या घोटाळ्यातील इतर दोषीवर कारवाई कधी करणार असा सवाल देखील विचारला जावू लागला.

भावाने मजुर म्हणून काम केले आपला यामध्ये कसलाही संबंध नव्हता जर मी मजुर म्हणून काम केले असले तरी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या दृष्टीस पडले असते. मी स्वत मजुर म्हणून काम केले नाही व सहीही केली नाही. यामधील आर्थीक गैरव्यवहारात आपला कसलाही संबंध नाही. दबावामुळे मला कारवाईत बळीचा बकरा बनवून अन्याय केला.
- अजित मुलाणी, निलंबित कोतवाल

Web Title: animal fooder scam in Mangalwedha