जनावरांची आरोग्यसेवा महागली

Cow
Cow

सोलापूर - राज्यात यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालल्याने शेतकरी जनावरांना बाजार दाखवू लागला आहे. बाजारामध्ये कवडीमोल किमतीने जनावरे विकू लागली आहेत. त्यातच आता शासनाने जनावरांची आरोग्यसेवा महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे पशुपालक शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरणार आहे.

शासकीय सेवेमध्ये असलेले पशुवैद्यक अधिकारी त्यांच्या कामाच्या वेळेव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्या जनावरांवर इलाज करतात. यासाठी शेतकऱ्याकडून किती पैसे घ्यायचे हे शासनाने ठरवून दिले आहे.

शेतकऱ्यांनी सरकारी पशुवैद्यकांना तपासणीसाठी किती पैसे द्यायचे हे २०१० मध्ये निश्‍चित केले होते. मात्र, त्यात सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासकीय पशुवैद्यकांच्या शेतकऱ्यांच्या दारात भेटी देण्याच्या फी आकारणीमध्ये वाढ केली आहे. एखादा पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या दारात कार्यालयीन वेळेपूर्वी, मध्यंतराच्या सुटीत, कार्यालयीन वेळेनंतर, रात्री-बेरात्री, साप्ताहिक किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी जनावरांवर इलाज करण्यासाठी गेल्यास त्याला शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याची परवानगी शासनाने दिली आहे. ते पैसे किती घ्यावेत हेही शासनाने ठरवून दिले आहे. २०१० मध्ये निश्‍चित केलेल्या दरामध्ये सुधारणा करून त्यात वाढ केली आहे.

जुने दर व कंसात सुधारित दर (रुपयांत)
 ग्रामपंचायत हद्द    ५० रुपये (७५ रुपये)
 ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेर    १०० (१५०)
 रात्रीच्या वेळी सेवा द्यायची झाल्यास    ७० (१५०)
 जनन प्रक्रियेत बाधा आल्यास    १०० (१५०)
 गाई-म्हैस आरोग्य दाखले    ५० (१००)
 घोडा आरोग्य दाखले    ७५ (१५०)
 मोठ्या जनावरांचा शवविच्छेदन दाखला    ७५ (१००)
 छोट्या जनावरांचा शवविच्छेदन दाखला    ५० (७५)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com