विचित्र प्राणी नाही, ही तर फोटोशॉपची करामत! 

solapur
solapur

सोलापूर  : सोलापूर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर अक्कलकोटजवळ शेतामध्ये एक विचित्र प्राणी दिसून आला.. असा मेसेज गेल्या आठवडाभरातून व्हायरल होत आहे. सोबत फोटोही जोडले आहेत. याबाबत "सकाळ'ने प्राणीशास्त्राच्या अभ्यासकांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. अशाप्रकारे कोणताही प्राणी अस्तित्वात नाही. खोडसाळपणाने कोणीतरी फोटोशॉपने एडीट केले आहे किंवा प्राण्यासारखा मॉडेल तयार करून हा मेसेज शेअर करून गैरसमज आणि भीती पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रा. प्रतीक तलवाड यांनी सांगितले. 

चेहरा माणसासारखा आणि बाकी शरीर मात्र एका विचित्र प्राण्यासारखा दिसत आहे. ही पोस्ट फेक आहे. तीन किंवा चार बोटे पायाला असल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारचा प्राणी अस्तित्वात असेल तर तो काय खात असेल. कोणत्या अधिवासात राहत असेल. यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित होतात. या उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे सहाजिकच हा प्राणी अस्तित्वात नाही समोर समजून घ्यायल हवे. फोटोशॉपचा वापर करून अशा विचित्र प्राणी तयार करून, एखाद्या प्राण्याला माणसाचा डोकं, माणसाच्या शरीराला प्राण्याचे डोकं लावून दोन-चार महिन्यात फोटो व्हायरल होत असतात, असे प्रा. तलवाड यांनी सांगितले. 

खात्री न करता कोणत्याही पशु-पक्ष्याविषयी पोस्ट व्हायरल करू नये. अशा प्रकारच्या मेसेजच्या माध्यमातून प्राण्यांविषयीची भीती आणि गैरसमज निर्माण होतात. चुकीची माहिती शेअर करणाऱ्यांवर सायबर क्राईम पोलिसांकडून कारवाई केली जावू शकते असेही प्रा. तलवाड यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्‍यात अशाप्रकारचा प्राणी अस्तित्वात नाही. अशाप्रकारची प्राण्याची नोंद जगात कोठेही आढळून येत नाही. ही फोटोशॉपची करामत आहे. किंवा मग प्राण्यासारखे मॉडेल तयार करून फोटो काढून ते गंमत म्हणून व्हायरल केले जात आहेत. 
- प्रा. प्रतीक तलवाड, प्राणीशास्त्राचे अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com