भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सोलापूरच्या ऋतुजा भोसले पराभव 
भारताच्या अकरा खेळाडूंचा दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला असून सोलापूरच्या ऋतुजा भोसलेचा पराभव झाला. आज झालेले सर्व सामने एकतर्फी झाले. उद्या एकेरीचे आठ सामने, तर दुहेरीचे चार सामने होणार आहेत. 

सोलापूर : प्रिसिजन जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत एकेरीमध्ये भारताची नंबर दोनची खेळाडू अंकिता रैना हिने आज विजयी सलामी दिली असून तिने सहज विजय मिळवत एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. तर, सोलापूरच्या ऋतुजा भोसले हिला खांदा दुखपत असल्यामुळे एकेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. 
कुमठा नाका येथील लॉन टेनिस कोर्टवर "प्रिसिजन सोलापूर ओपन वूमन्स आयटीएफ टेनिस टुर्नामेंट'स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज पात्रता फेरीतील पहिल्या फेरीचे सामने खेळविण्यात आले. 

हेही वाचा : पुण्यात राष्ट्रीय स्केटींगपटूची दारुच्या बाटलीने गळा चिरुन हत्या 

सोलापूरच्या ऋतुजा भोसलेचा पराभव 
भारताच्या हुमेराबेगम शेख, प्रतिभा प्रसाद, परिन शिवेकर, पूजा इंगळे, सोहा सादिक, अंकिता रैना, रिया भाटिया, जेनिफर लुइखेम या खेळाडूंनी आपापले सामने जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताच्या अंकिता रैना हिने युक्रेईनच्या व्हॅलेरिया स्ट्राखोवाचा 6-3, 6-0 असा सहज पराभव केला. तसेच, भारताच्या रिया भाटिया हिने भारताच्याच नित्तूरे आकांक्षावर 6-3, 6-0 अशी मात केली. भारताच्या जेनिफर लुइखेम हिने रशियाच्या अना मोरगिनाचा 6-4, 6-1 असा पराभव केला. 

हेही वाचा : "किंग इज बॅक'; विराट पुन्हा ठरला टॉपर! 

मुख्य फेरीचे निकाल 
अंकिता रैना (भारत) वि. वि. व्हॅलेरिया स्ट्राखोवा (यूक्रेईन) 6-3 6-0, व्हॅलेरिया साविंख्या (रशिया) वि. वि. एकटेरिना यशीना (रशिया) 6-3 6-2, रिया भाटिया (भारत) वि. वि. सौम्या विग (भारत) 6-3, 6-0, कॅटी बोल्टर (ग्रेट ब्रिटन) वि. वि. ऋतुजा भोसले (भारत) 6-4 6-1, ऐकेरी उलरिक्के (नॉर्वे) वि. वि. आकांक्षा नित्तूरे (भारत) 6-0 6-0, मानांचया सवंगकाएव (थायलंड) वि. वि. एमिली वेबली स्मिथ (ग्रेट ब्रिटन) 6-3, 7-6 (3), जेनिफर लुइखेम (भारत) वि. वि. अना मोरगिना (रशिया) 6-4, 6-1, ख्रिस्ती फ्रेया (ग्रेट ब्रिटन) वि. वि. सोहा सादिक (भारत) 6-7 (5), 6-1, 6-2, नैकथा बेन्स (ग्रेट ब्रिटन) वि. वि. रम्या नटराजन (भारत ) 6-0 6-4, वैदेही चौधरी (भारत ) वि. वि. स्टेफि कारुथेर्स (सामोआ) 6-4 6-2, सॅन्ड्रा समीर (इजिप्त ) वि. वि. नूडनीदा लुआंगणाम (थायलंड ) 5-7, 6-4, 6-1, एम्मा राडूकाणू ( ग्रेट ब्रिटन ) वि. वि. देस्पिना पापमोचल (ग्रीक ) 6-2, 6-1.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankita Raina's winning salute to India