
तासगाव बसस्थानक चौकात डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा प्रतीकात्मक पुतळा बसवून आंदोलन करण्यात आले.
esakal
हायलाइट्स (Highlight Summary – 3 Points)
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र आंदोलन
मातंग समाजाचे नेते प्रशांत सदामते यांच्या पाच दिवसांच्या उपोषणानंतरही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
आरक्षण उपवर्गीकरण आणि ‘भारतरत्न’ची मागणी
समाजाने आरक्षणाचे उपवर्गीकरण, डॉ. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’, पुण्यात मातंग समाजासाठी ‘आर्टी’ संस्था आणि सांगली, तासगावात पूर्णाकृती पुतळे उभारणीच्या मागण्या केल्या.
प्रशासनाची धावपळ व आश्वासन
अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिस आणि महसूल विभाग धावला. तहसीलदार अतुल पाटोळे आणि मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी दोन जागांचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
Tasgaon Police : मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी पाच दिवस उपोषणाला बसलेले समाजाचे नेते प्रशांत सदामते यांच्या मागण्यांची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज पहाटे तासगाव बसस्थानक चौकात साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा प्रतीकात्मक पुतळा बसवून आंदोलन करण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रशासन, पोलिसांची धावपळ उडाली.