अण्णा हजारे २ ऑक्टोबर पासुन राळेगण सिद्धीत उपोषणाला बसणार

मार्तंड बुचुडे
शनिवार, 26 मे 2018

राळेगणसिद्धी : शेतक-यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व शेतक-यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी या आणि इतर मागण्यासाठी मार्च मध्ये आंदोलन केले होते. त्या वेळी आपण या मागण्या पुर्ण करण्याचे लेखी अश्वासन दिले होते.

राळेगणसिद्धी : शेतक-यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व शेतक-यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी या आणि इतर मागण्यासाठी मार्च मध्ये आंदोलन केले होते. त्या वेळी आपण या मागण्या पुर्ण करण्याचे लेखी अश्वासन दिले होते.

आज आपल्या सरकारला स्थापण होऊन चार वर्ष झाली आहेत. जर या मागण्यांची लवकरात लवकर मंजूर झाल्या नाहीत तर दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपासून पुन्हा राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.  हजारे यांनी आज ( ता. 26 ) प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्रसिंह यांना वरील आशयाचे पत्र पाठवून कळविले आहे. या पत्राच्या प्रती माहीती साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषी राज्यमंत्री जितेंद्रसिंह शेखावत यांनाही पाठवल्या आहेत.   

पत्रात पुढे म्हटले आहे की, आपल्या सरकारच्या चौथ्या वर्धापणदिनाचे औचित्य साधून आपणास मी आठवण करूण देत आहे. आपण निवडणुक काळात आम्ही सत्तेवर आलो तर देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी तत्काळ करू. तसेच देशातील भ्रष्टाचार कमी करू असे आश्वसान दिले होते. मात्र आपले सरकार स्थापण होऊन चार वर्ष झाली तरी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. देशातील भ्रष्टाचारही कमी झाला नाही. तसेच शेतक-यां साठी स्वामीनाथन आयोगीची अंमलबजावणी करण्याचेही अाश्वसन दिले होते. शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव देऊ, वयोवृ्द्ध 60 वर्षावरील शेतक-यांना दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात येईल, शेती औजारावरील जी.एस.टी. माफ करू असे अश्वासन दिले होते.   याच मागण्यासाठी मी मार्च 2018 ला पुन्हा रामलिला मैदानवर ऊपोषण केले होते. त्याही वेळी आपण या मागण्या पुर्ण करण्या बाबत लेखी अश्वासन दिले आहे. मात्र त्या बाबतही अध्यापही कोणतीच कार्यवाही करण्यात आल्याचे दिसत नाही. मी या बाबत पुन्हा आठवण करूण देत आहे. या पुर्वीही मी दोन वेळा आपणास स्मरणपत्रही पाठवली आहेत. वास्तविक चार वर्षात भ्रष्टाचार थांबविण्यासाठी महत्वाचा असणारा लोकपाल व लोकायुक्ता सारखा चांगला कायदा आपण अध्यापही आमला नाही मात्र निवडणुक प्रचार काळातही हा कायदा त्वरीत अंमलात आणण्याचे अश्वासन दिले होते याचा अर्थ आपणास भ्रष्टारामुक्त भारत करण्याची इच्छा नाही असे दिसते. जर ऑक्टोबर पर्यंत माझ्या मागण्याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर राळेगणसिद्धी येथे दोन ऑक्टोबरपासून मी पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे पत्राद्वारे हजारे यांनी कळविले आहे.

Web Title: anna hazare will start hunger strike from 2nd October in ralegansiddhi