अण्णा हजारेंचे 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीत आंदोलन

मार्तंड बुचुडे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीमालाला ऊत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा,  वृद्ध शेतक-यांना पेन्शन मिळावी तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकाय़ुक्ताची नेमणुक करावी व निवडणुक पद्धतीत सुधारणा करावी या आणि इतर मागण्यासाठी पंतप्रधान व त्यांच्या कार्यलायास  अनेक वेळा पत्र पाठवली आहेत. या मागण्यां बाबत सरकार कोणताच सकारात्मक निर्णय घेत नसल्याने मी येत्या दोन ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

राळेगणसिद्धी- स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीमालाला ऊत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा,  वृद्ध शेतक-यांना पेन्शन मिळावी तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकाय़ुक्ताची नेमणुक करावी व निवडणुक पद्धतीत सुधारणा करावी या आणि इतर मागण्यासाठी पंतप्रधान व त्यांच्या कार्यलायास  अनेक वेळा पत्र पाठवली आहेत. या मागण्यां बाबत सरकार कोणताच सकारात्मक निर्णय घेत नसल्याने मी येत्या दोन ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, मी  23 मार्चला रामलिला मैदानावर केलेल्या ऊपोषणाच्या वेळी सरकारने दिलेली लेखी अश्वासने पाळली नाहीत. तसेच सरकारने जनतेला निवडणुक काळात दिलेली अश्वासने व मला ऊपोषणाच्या दरम्यान दिलेली अश्वासने पाळली नाहीत. आम्ही सत्तेवर आल्यावर लोकपाल व लोकायुक्त तात्काळ आमलात आणू व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीही लागू करू असे अश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येऊन चार वर्षे लोटली तरीही काहीच कारवाई झाली नाही. लोकपाल व लोकायुक्त अंमलबजावणीमुळे देशातील भ्रष्टाचार कमी होणार आहे मात्र सरकार ते करत नाही. तसेच, देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची गरज आहे. म्हणून सरकराने दोन ऑक्टोबरपर्यंत याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर राळेगणसिद्धी येथे आंदोलन  सुरू करणार असल्याचे कार्यकर्त्यांना केलेल्या अवाहनात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, मला स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा व महात्मा गांधीच्या विचाराचा प्रभाव माझ्यावर पडला आहे. त्यामुळे ग्रामविकासाला गती देणे व विकास कामाला लगलेला भ्रष्टाचाराचा महारोग थांबविण्याचे  काम  करत आहे. अनेक वेळा मागणी करूणही सरकार हे कायदे अमलात आणत नसल्याने संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकारानुसार, मी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मी समाजासाठी अत्तापर्यंत 19 वेळा ऊपोषण केले आहे. मात्र पत्रात शेवटी हजारे यांनी कार्यकर्त्यांना अवाहन केले आहे की, ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी राळेगणसिद्धीला न येता आपल्या गावात, तहसिल कार्यलय  किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करावे अशी ही विनंती या पत्रात केली आहे.

Web Title: Anna Hazare's agitation since October 2