ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अतिश दाभोलकर यांना चिरमुले पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अतिश दाभोलकर यांना चिरमुले पुरस्कार जाहीर

सातारा : युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे संस्थापक वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या चिरमुले ट्रस्टमार्फत दिला जाणार अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार 2018 साठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अतिश दाभोलकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती चिरमुले ट्रस्टचे विश्वस्त श्रीकांत जोशी, डॉ. अनिल पाटील, समीर जोशी, दिलीप पाठक, डॉ. अच्युत गोडबोले व निवड समितीचे समन्वयक अरुण गोडबोले यांनी दिली आहे.
 
डॉ. अतिश दाभोलकर हे कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ म्हणून ख्यातकीर्त आहेत. प्रयोग परिवाराचे प्रणेते मुकुंद तथा श्रीपाद व वृंदा दाभोलकर यांचे ते सुपुत्र आहेत. गारगोटी (जि. कोल्हापूर) येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण, तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण झाले असून, फिजिक्‍समध्येच संशोधन करण्याची तीव्र इच्छा मनात असल्याने त्यांनी आयआयटी खरगपूर येथे एमएस्सी व नंतर अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात फिजिक्‍समध्ये संशोधन करून पीएचडी प्राप्त केली आहे. 1990 ते 1996 या कालावधीत ते अमेरिकेतील नामवंत विद्यापीठात सीनियर असोसिएट म्हणून विद्यादान व संशोधनाचे काम करत होते. 1996 ते 2010 या कालावधीत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.

त्यानंतर स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली या देशांतील महत्त्वपूर्ण संशोधन संस्था रिसर्च सायंटिस्ट म्हणून त्यांनी संशोधन केले आहे. 2014 मध्ये आयसीटीपीमध्ये त्यांची ज्येष्ठ संशोधक म्हणून निवड झाली. 2019 ला ते त्या संस्थेचे असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून निवडले गेले आहेत. 2020 मध्ये वयाच्या केवळ 57 व्या वर्षी त्यांची या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त संस्थेच्या प्रमुखपदी निवड झाली. डॉ. दाभोलकर यांची तीसहून अधिक संशोधनात्मक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा, सेमिनार व विद्यापीठे यामध्ये त्यांचा सहभाग व मार्गदर्शन असतो. फ्रान्सच्या राष्ट्रीय रिसर्च एजन्सीने त्यांना चेअर ऑफ एक्‍सलन्स पुरस्काराने गौरविले आहे. केंद्र सरकारतर्फे शांतीस्वरूप भटनागर आणि नॅशनल लिडरशीप ऍवार्ड इन सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या संशोधन क्षेत्रातील दोन्ही सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोरोना विषाणूमुळे पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम संसर्ग कमी झाल्यावर साताऱ्यात होणार आहे, असल्याचे श्री. गोडबोले यांनी सांगितले.


हेही वाचा : शाब्बास रे पठ्ठया ! चालत्या ट्रेनमधून उडी मारुन चाेरट्यास पकडले

वाचा : आपलं घर भरलेलं असावं पोरी..वेळ काही सांगून येत नाही...
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com