अमरनाथ यात्रेसाठी जिल्ह्यातून आणखी ४५० भाविक रवाना

अमरनाथ यात्रा तूर्त स्थगित
Amarnath Yatra
Amarnath YatraSakal

सांगली - अमरनाथ गुहेजवळ जलआपत्ती निर्माण झाल्याने यात्रा तूर्त स्थगित केली असून, बचाव कार्यानंतर ती पूर्ववत सुरू होणार आहे. अमरनाथमध्ये ही परिस्थिती असली, तरी जिल्ह्यातील ४५० हून अधिक भाविकांची एक तुकडी काल (ता. ९) आणि आज दर्शनासाठी रवाना झाली. आपत्तीमुळे भीतीचे वातावरण असले, तरी श्रद्धा आणि दर्शनाची ओढ यामुळे हे भाविक रवाना झाले.

कोरोनामुळे दोन वर्षाचा खंड पडल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेला जाण्याची जिल्ह्यातील हजारो भाविकांनी तयारी केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या प्रयत्नातून दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ यात्रेला जातात. यंदा यात्रा सुरू असल्यामुळे त्यांनी सांगली आणि परिसरातील जवळपास २,२०० भाविकांनी दर्शन घडवून आणण्याची तयारी केली आहे. एक तुकडी अगोदरच रवाना झाली आहे. तसेच जिल्ह्यातील इतरही ग्रुपमधून भाविक अमरनाथला गेले आहेत.

अमरनाथ गुहेजवळ मोठी दुर्घटना घडल्यामुळे भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दुर्घटनेत जिल्ह्यातील पाचजण बचावले आहेत. तेथील दुर्घटनेमुळे यात्रा तूर्त स्थगित केली आहे. बेस कॅम्पवर भाविकांना स्थलांतरित केले आहे. बचावकार्यानंतर यात्रा सुरू होईल, असे तेथील स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनाची ओढ लागली आहे.

एकीकडे ही परिस्थिती असली, तरी इच्छाशक्तीमुळे काल आणि आज शहर परिसरातील आणखी ४५० हून अधिक भाविक दर्शनासाठी रवाना झाले आहेत. २१ जुलैपर्यंत आणखी शेकडो भाविक रवाना होणार आहे. अमरनाथ यात्रेतील दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष तत्पर ठेवला आहे. अमरनाथमध्ये भाविक अडकले असल्यास मदतीसाठी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कक्षाशी संपर्क साधला असता, आजच्या परिस्थितीबाबत कोणतीही माहिती आली नसल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com