बागल गटाला आणखी एक धक्का?

अण्णा काळे
बुधवार, 8 जानेवारी 2020

तालुक्यातील आदिनाथ व मकाई दोन्ही कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी बागल गटाच्या कार्यकर्त्या रश्‍मी बागल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवेसेनेची उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांचा त्यात पराभव झाला.

करमाळा (सोलापूर) : करमाळा- माढा विधानसभा मतदारसंघात महत्त्वाचा समजला जाणाऱ्या बागल गटाला आणखी एक धक्का बसण्याचे संकेत आहेत. तालुक्यातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे तबल ११ संचालक बंडाच्या तयारी असून याबाब त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कामगाराचा २५ महिन्याला थकलेला पगार आणि कारखान्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी पवार यांच्याशीवाय पर्याय नसल्याचे ते सांगत आहेत. 

हेही वाचा - संपातही सुसाट धावली एसटी
राष्ट्रवादीला सोडचिट्टी...

तालुक्यातील आदिनाथ व मकाई दोन्ही कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी बागल गटाच्या कार्यकर्त्या रश्‍मी बागल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवेसेनेची उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांचा त्यात पराभव झाला.विधानसभा निवडणुक प्रचारात चारच महीन्यात बागलांच्या ताब्यातील मकाई व आदिनाथ गतवैभव प्राप्त करून देऊ असे आश्वासन तात्काळालीन मंञी तानाजी सावंत यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिले .माञ सध्या सावंत यांनाच मंञीमंडळातुन डावलण्यात आले आहे. त्यातच आता बागल गटाच्या ताब्यातील मकाई कारखान्याचे तब्बल ११ संचालक बंड करणार आहेत, अशी चर्चा तालुका भर सुरू आहे.तालुक्यातील आदिनाथ व मकाई दोन्ही कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. यापुर्वीच आदिनाथचे माजी अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह 7 संचालक बाहेर पडले आहेत. आता आदिनाथ पाठोपाठ मकाईच्या संचालकही बंडाच्या पविञ्यात आहेत.

हेही वाचा- मोहोळमध्ये पती- पत्नीने का केली आत्महत्या?
मकाई वाचवण्यासाठी

मकाई सहकारी साखर कारखाना यावर्षी बंद अवस्थेत आहे. कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असून कामगारांच्या 25 महिन्याचा पगार थकलेले आहे. मकाई कारखाना वाचवायचा असेल राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, असे या संचालकांचे म्हणणे आहे. हे संचालक शरद पवार यांच्यासह आमदार रोहीत पवार यांच्या संपर्कात आहेत. यापुर्वी बागल राष्ट्रवादीत असताना पावरांनी आदिनाथ व मकाई या दोन्ही कारखान्याना मदत केली आहे. पवार कुंठुबियांच्या माध्यमातून कारखान्यास पैसे उपलब्ध करून कारखाना सुरु करण्याचा निर्णय या संचालकांनी घेतला असल्याची चर्चा आहे.श्री मकाई सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून बागल गटाच्या ताब्यात आहे. बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल हे मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. 

संचालक मंडळाच्या सभेला गैरहजरी
संचालक मंडळाची 2 जानेवारीला बैठक झाली. या बैठकीला 11 संचालक गैरहजर होते. त्यामुळे मंगळवारी (ता. 7) पुन्हा संचालक मंडळाची बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीलाही सहा संचालक गैरहजर राहीले. तर जे संचालक बंडखोरीच्या तयारीत आहेत त्या संचालकांनी बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. मकाईचे संचालक संतोष देशमुख तर बैठकीत तडकाफडकी निघुन आले, अशी चर्चा आहे. या संचालकांनी गेली महीन्याभरापासुन अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत थेट पवार साहेबांच्या संपर्कात असल्याचे खाञीलायक वृत्त आहे. त्यामुळे संचालकांची मनधरणी करण्यासाठी अध्यक्ष दिग्विजय बागल हे प्रयत्न करत आहेत.त्यात ते कितपत यशस्वी होतात तो येणार काळच सांगणार आहे. 

हेही वाचा - पत्ता सांगताय थांबा
होया आम्ही पवार यांच्या संपर्कात

होय, आम्ही पवार साहेबांच्या संपर्कात आहोत.अध्यक्ष दिग्विजय बागल हे मनमानी कारभार करतात, हुकुमशाहीची भाषा वापरतात.संचालकांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात.आम्हा संचालकांना तुम्ही फुकट संचालक झालात,तुमची वाॅटर लागली अशी भाषा संचालक मंडळाच्या बैठकीत वापरतात.कारखान्यावर कोट्यावधीचे कर्ज झाले आहे.कामगारांच्या पगार तर थकल्या आहेत वरून कारखान्याने कामगारांच्या नावावर कर्ज काढले आहे. कामगारांच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढवला गेला आहे. मकाई कारखाना वाचवण्यासाठी आम्ही पवार साहेबांच्या संपर्कात आहे,आम्ही जुनेच पवारसाहेबांचे कार्यकर्ते असून पवारसाहेब कारखान्याला सहकार्य करण्याबाबात सकारात्मक आहेत.
- संतोष देशमुख , संचालक,

श्री मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी ता करमाळा 

कोणी नाराज नाही
संचालकात नाराजी नाही. काल संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात संचालकांनी कारखान्याची देणी देण्यासाठी प्रयत्न करावा, त्यासाठी एखादे कर्ज प्रकरण करावे, असे सर्वांनच संचालकांनी सुचवले. कारखान्याची देणी देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून प्रयत्न करायचे आमचे ठरले आहे. संतोष देशमुख यांचे काहीतरी काम होते. म्हणून ते लवकर गेले. कुणी संचालक नाराज वगैरे नाही. 
- दिग्विजय बागल, अध्यक्ष, श्री मकाई सह साखर कारखाना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another blow to the Bagal group