नगर : डेंगीसदृश आजारामुळे आणखी एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

डेंगीसदृश आजाराने शहरातील आणखी एका तरुणाचा काल (सोमवारी) उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू झाला. जब्बार बाबूलाल अतार (वय 25) असे त्याचे नाव आहे.

श्रीरामपूर (नगर) : डेंगीसदृश आजाराने शहरातील आणखी एका तरुणाचा काल (सोमवारी) उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू झाला. जब्बार बाबूलाल अतार (वय 25) असे त्याचे नाव आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील बिफ मार्केटशेजारील घरकुलात अतार याचे कुटुंब राहते. काही दिवसांपासून आजारी असल्याने जब्बार याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. काल रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. डेंगीसदृश आजारानेच जब्बारचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

दरम्यान, डेंगीसदृश आजाराचा शहरातील हा दुसरा बळी आहे. मागील आठ दिवसांपूर्वी मोरगेवस्ती येथील काळुआई मंदिर परिसरातील अनिल पवार (वय 32) याचा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता जब्बार याचा मृत्यू झाल्याने शहरात या आजाराबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरासह तालुक्‍यात अनेक डेंगीसदृश आजाराचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another death due to dengue