Atpadi Accident : 'अपघातातील जखमी आणखी एकाचा मृत्यू'; शेगावला दर्शन घेतले अन्..
Fatal Aftermath of Shegaon Trip: दुपारी चारच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अंजनगाव मार्गावर त्यांची जीप व एसटी बसची समोरासमोर धडक झाली. त्यात जीप चालक आप्पासाहेब आतकरी (खटाव, जि. सातारा) आणि दस्तगीर मुलाणी (गोमेवाडी, ता. आटपाडी) यांचा मृत्यू झाला. दोन गंभीर जखमी व इतर पाच जण जखमी होते.
आटपाडी: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा, अंजनगाव मार्गावर शनिवारी (ता. २५) दुपारी झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमीतील एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुकुंड पुरुषोत्तम देशपांडे (वय ६०, गोमेवाडी) असे मृताचे नाव आहे.