अनुराधा काजळे यांनी फडकावला "किलीमांजारो'वर तिरंगा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. या शिखरावर जाणाऱ्या त्या सोलापुरातील पहिल्या महिला व जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत. 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. या शिखरावर जाणाऱ्या त्या सोलापुरातील पहिल्या महिला व जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत. 

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून उंची समुद्रसपाटीपासून 19 हजार 341 फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्‍वविक्रम केला होता. गेल्या सहा वर्षांत सोलापुरात शेकडो गिर्यारोहक, 360 एक्‍सप्लोररचे प्रमुख आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. आजवर तब्बल 12 गिर्यारोहकांनी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली माउंट किलीमांजारो शिखर सर केले आहे.

आनंद यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव करून काजळे यांनी ही मोहीम यशस्वी केली. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता किलीमांजारो शिखराच्या गिलमन्स पॉइंट या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकावला. शिखर सर करून आल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी आनंद बनसोडे, अक्षया बनसोडे, रोहित शेंडे, सागर जानराव, संजीवकुमार कलशेट्टी, उमेश डुमणे, कैलास जानराव उपस्थित होते. 

दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केल्याचे हे यश माझ्या कुटुंब व मित्रपरिवाराला समर्पित करत आहे. पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास तेही आफ्रिकेत असल्यामुळे खूप भीती वाटत होती, परंतु एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी योग्य असे मार्गदर्शन केल्याने अडचणी आल्या नाहीत. अतिशय त्रास होत असतानाही अंतिम चढाई पूर्ण करू शकले, याचा मला आनंद आहे. 
- अनुराधा काजळे, गिर्यारोहक

Web Title: anuradha kajale on kilimanjaro