पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन

राजकुमार थोरात
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्यामध्ये समाधानकारक पाणी साठा असुन, शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी केले आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्यामध्ये समाधानकारक पाणी साठा असुन, शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी केले आहे.

सुरुवर्षी इंदापूर, बारामती, दौंड तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली असल्याने पाण्याची टंचाई आत्तापासुनच जाणवू लागली आहे. नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रामध्ये चांगला पाउस झाल्याने  धरणे भरली ईह्त. धरणातुन नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या मदतीने बंधाऱ्याची ढापे टाकून पाणी अडवले आहे. बहुतांश बंधाऱ्यामध्ये आज समाधानकारक पाणी साठा असल्याने शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. बंधाऱ्यातुन पाण्याची गळती ही अतिशय कमी प्रमाणात होत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास उन्हाळ्यामध्ये या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ही मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा आत्तापासुन काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी केले आहे.

पुणे पाटबंधारे विभागातंर्गत इंदापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये नीरा नदीवरती कोल्हापूर पद्धतीचे ९ बंधारे आहेत. सर्वच बंधाऱ्यामध्ये समाधानकारक पाणी साठा आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. 

Web Title: Appeal to Irrigation Department to use water efficiently