महापौरांच्या उमेदवारी अर्जाला तीन अपत्यांच्या मुद्यावर हरकत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सांगली : महापौर हारुण शिकलगार यांनी पक्षश्रेष्ठींपुढे आपल्या ज्येष्ठत्वाचा शब्द टाकत पक्षाची उमेदवारी पटकावण्यात यश मिळवले खरे मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जाला खणभागातील कार्यकर्ते असिफ बावा यांनी तीन अपत्यांच्या मुद्यावर छाननीत आक्षेप घेतला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी सुरु असून दोन्हीकडील वकिलांचा ताफा त्यासाठी सज्ज आहे. 

शिकलगार यांच्याविरोधात पक्षांतर्गत विरोधकांनी उमेदवारी मिळू नये यासाठी प्रारंभपासून डावपेच आखले होते. पहिल्या टप्प्यात त्याची पक्षाच्या पातळीवरच उमेदवारी कापण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यावर मात करीत शिकलगार यांनी राजेश नाईक यांना माघार घेण्यास भाग पाडले. मात्र विरोधकांनी आधीपासूनच गोळा केलेला दारुगोळा आता वापरण्यास सुरवात केली आहे. असिफ बावा यांनी खणभागापुरती मर्यादित आघाडी केली आहे. या आघाडीतील उमेदवार म्हणून त्यांनी आज शिकलगार यांच्या अर्जाला आक्षेप घेताना तीन अपत्यांचा मुद्दा पुढे केला. यावर निवडणूक अधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Appeal to the Mayors candidature on the issue of three child