'साहेब, 20 वर्षे काम करतेय; आता तरी पगार सुरु करा'; शिक्षिकेची विनवणी

निवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षिकेची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी
'साहेब, 20 वर्षे काम करतेय; आता तरी पगार सुरु करा'; शिक्षिकेची विनवणी
Updated on: 

कामेरी : अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात (senior college)वीसहून अधिक काळ बिनपगारी काम करणाऱ्या व दोन वर्षांत निवृत्त होणाऱ्या पन्नासहून अधिक शिक्षक (teachers) आहेत. एका शिक्षिकेने मुख्यमंत्र्यांना (CM maharashtra)‘साहेब, मी वीस वर्षे बिनपगारी काम करत आहे. माझी विवाहित मुलगी माझ्या संसाराला हातभार लावते. सन २०२३ मध्ये मी निवृत्त होतेय. आता तरी पगार सुरु करा, अशी विनवणी केली आहे.

सध्या ज्ञानदानाचे काम करणाऱ्या व निवृत्तीला (retire teachers) आलेल्या अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात २००२ पासून ते २०१९ पर्यंत बिनपगारी प्रस्तावित, वाढीव पदावर काम करणाऱ्या पन्नासहून अधिक शिक्षक-शिक्षिकाची आहे. राज्यात १२९३ पदांवर असे शिक्षक होते. त्यातील काही वाढीव पदांना पद मान्यता मिळालेली नाही, तर काहींना रोष्टर, जाहिरात नसल्याने पगारास (salary) मंजुरी मिळाली नाही. काही नोकरी सोडून गेले. काही निवृत्त झालेत. यातील ६२० पदे शिल्लक आहेत. त्यातील ५० हून अधिक जण दोन-तीन वर्षात निवृत्त होत आहेत.

'साहेब, 20 वर्षे काम करतेय; आता तरी पगार सुरु करा'; शिक्षिकेची विनवणी
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकुलत्या एक मुलाचा मृत्यू; शिरगुप्पीतील घटना

अधिवेशनात या सर्व पदाची माहिती शासनाने राज्यातील सर्व विभागीय मंडळांना संचालक कार्यालयात एकत्रित करून ती अधिवेशनात सादर करण्याबाबत सूचित केले होते. काही विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही माहिती वेळेत सादर झाली नाही. ती अधिवेशनात सादर होऊ शकली नाही. त्यामुळे प्रश्न पुन्हा प्रलंबितच राहिला.

"शासनाने कोरोना काळात सर्वांना सहकार्य केले. आता तरी न्याय द्या."

- शिवाजी अंगज, वाढीव पद संघटनेचे पदाधिकारी

'साहेब, 20 वर्षे काम करतेय; आता तरी पगार सुरु करा'; शिक्षिकेची विनवणी
Jobs| भारतीय डाक विभागातर्फे विविध पदांची ऑनलाईन भरती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
Marathi News Esakal
www.esakal.com