दुधाचे नवे दर खासगीलाही लागू करा - संतोष वाडेकर

सनी सोनावळे
सोमवार, 11 जून 2018

टाकळी ढोकेश्वर - राज्य सरकारने दूध दरवाढीसंबंधी नव्याने काढलेल्या परिपत्रकाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे दुधाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, ही दरवाढ केवळ सरकारी दूध संघांपुरती मर्यादित न राहता, खासगी डेअरीलाही बंधनकारक करावी,अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर यांनी केली आहे.

दुधाचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकराने नुकते एक परिपत्रक काढले आहे. दुधाचे दर वाढविण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेसह अन्य समविचारी शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संतोष वाडेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'या परिपत्रकानुसार एसएनएफ कमी असलेल्या दुधालाही चांगला दर दिला जाईल. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व भूमिपुत्र शेतकरी संघटना सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आहे. मात्र, हा आदेश केवळ सहकारी संस्थांना लागू आहे. खासगी दूध संस्थांना हा शासन आदेश बंधनकारक नसल्याने राज्यातील साठ टक्के दूध संकलन करणाऱ्या खासगी संस्था दूध उत्पादकांना या आदेशा प्रमाणे दर देतील का?असा प्रश्न निर्मान झाला आहे. शिवाय सहकारी दूध संस्थांवर सरकारचा वचक राहिला नसल्याने या संस्थाही या परिपत्रकाचे कितपत पालन करतील याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे केवळ शासन आदेश काढून दूध उत्पादकांचा प्रश्न सुटणार नाही. दूध प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर सरळ अनुदान देणे आवश्यक आहे. असा ठोस निर्णय होईपर्यंत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यासाठी आपला लढा सुरूच ठेवणार आहे.'

Web Title: Apply the new rate of milk to the private - Santosh Wadekar