जाती संपवण्यासाठी एकत्र यावे - डॉ. पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

वारणावती (जि. सांगली) - जाती संपवायच्या असतील तर मराठ्यांसह सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, हे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत मराठा आरक्षण यशस्वी होणार नसल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

मणदूर (ता. शिराळा) येथे सुरू झालेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या 20व्या राज्य अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. भारत पाटणकर व गेल ऑम्वेट, महिला कार्यकर्त्या यांच्या हस्ते मशाल पेटवून अधिवेशनाचे उद्‌घाटन झाले. संपत देसाई, वसंत पाटील, डॉ. प्रशांत पन्हाळकर, मारुती पाटील, दिलीप पाटील, डी. के. बोडके, मेजर सुभेदार बन, धर्मसागर भारती यांनी मार्गदर्शन केले.

पाटणकर म्हणाले, 'श्रमिक मुक्ती दलाच्या 30 ते 32 वर्षांच्या संघर्षातून तासगाव, आटपाडी समन्यायी पाणीवाटप अंतिम मंजुरी देशातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पास मिळाली. मोठ्या धरणाचे पाणी या योजनेसाठी 100 टक्के द्यावे लागणार. अलिबाग येथील शेकडो एकर जमीन कोळशावर आधारित वीजनिर्मितीसाठी संपादित करण्यास श्रमिकने विरोध करून समुद्राच्या लाटा, वारा, सूर्य यांच्यापासून तीन हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे महत्त्व पटवून दिले; तसेच कोळशाचे प्रदूषण रोखले व पर्यावरणाचे स्वच्छता अभियान सुरू केले.

Web Title: Are to come together to finish