गॅस दर वाढीचा झटका; भिडले ग्राहक-डिलिवरी बॉय  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

गॅस दरवाढीने ग्राहकात व डिलिवरी बॉयमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची घटना झरे येथे घडली आहे. रात्रीत 150 रुपयांची वाढ केल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. 

झरे (जि. सांगली) - गॅस दरवाढीने ग्राहकात व डिलिवरी बॉयमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची घटना झरे येथे घडली आहे. रात्रीत 150 रुपयांची वाढ केल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. 

हे पण वाचा - गॅस सिलेंडरच्या चालत्या ट्रकने कागल जवळ घेतला पेट.... 

याबाबत अधिक माहिती अशी, इंडियन गॅस व भारत गॅस या कंपनीचे या परिसरात जास्तीत जास्त कनेक्शन आहेत. परंतु रात्रीत 150 रुपयांची वाढ केल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. डिलिव्हरी बॉय व ग्राहकांमध्ये अनेक ठिकाणी खडाजंगी झाल्याचे दिसून आले, गॅसचे दर कमी जास्त होतात, परंतु अचानक 150 रुपयांची वाढ झाल्यामुळे ग्रृहिनिंचे सर्वच बजेट कोलमडलं आहे. 
जानेवारीतच थोडीफार वाढ झाली होती. परंतु, अचानक रात्री दीडशे रुपये झालेली वाढ म्हणजे हे ग्राहकाला शॉक दिल्यासारखे झाले आहे. भारत गॅस एजन्सीने जवळजवळ 145.5 तर इंडियन गॅस ने 144.5 रुपये एवढी वाढ केली आहे. 

ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे. त्यामुळे सिलेंडर भरण्यासाठी गावातील कोणत्यातरी दुकानदाराकडे कार्ड आणि पैसे ठेवून गेलेले असतात. गॅस भरून घ्यायचा म्हटले तर अचानक झालेली वाढ पाहून दुकानदार व गॅस वितरक यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादावाद झाल्याचे चित्र निर्माण झाले
ने ग्राहकांनी गॅस दुकानदाराकडे ठेवला आहे. अचानक एवढे पैसे आणायचे कुठून म्हणून अनेक ठिकाणी गॅस ग्राहकांनी भरून घेतले नाहीत. या गॅस दरवाढीचा अनेक भागातून निषेध होत आहे.

हे पण वाचा - विषय हार्ड तर ; उडव की मग हवेत बार... 

दरम्यान, ही दरवाढ मागे घ्यावी अन्याता याविरोधात आंदोलन उभारले जाईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. 

एवढी झाली वाढ
भारत गॅस          इंडियन  गॅस 

पूर्वी चा दर          पूर्वी चा दर 
    698.50                699
सध्याचा दर          सध्याचा दर 
    844                   844. 50 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: argument between customer delivery boy because increase gas rate