
Robbery At SBI Bank
esakal
Armed Robbery SBI Branch : चडचण (जि. विजयपूर) शहरातील उमदी-पंढरपूर महामार्गावर चार ते पाच दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने व कोट्यवधींची रोकड असा सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. विजयपूरचे पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून, दरोदेखोरांचा शोध घेत आहेत.