देशसेवेचे लक्ष्य गाठणाऱ्या तरुणांत पसरतीये निराशा

शामराव गावडे
Saturday, 19 September 2020

गेली पाच महिने कोरोनामुळे शाळा महाविद्यालय सोबतच करिअर ॲकॅडमी बंद झाल्या आहेत.

नवेखेड  : करिअर अकॅडमी बंद झाल्याने सैन्य आणि पोलीस दलात भरती होणाऱ्या तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. भरती त्वरित सुरू कराव्या अशी मागणी भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणांकडून होत आहे. गेली पाच महिने कोरोनामुळे शाळा महाविद्यालय सोबतच करिअर ॲकॅडमी बंद झाल्या आहेत. अलीकडील काही वर्षात सैन्य व पोलीस दलात भरतीसाठी नियोजनबद्ध व्यायाम, शारीरिक क्षमता, त्याचबरोबर बौद्धिक मार्गदर्शन यासाठी अनेक ठिकाणी करिअर अकॅडमी स्थापन झाल्या. 

हेही वाचा - भय कोरोनाचे ;  शाळा बंद मात्र कलाशिक्षकाचे समुपदेशनाचे काम सुरुच

ग्रामीण शहरी भागातील अनेक तरुण निवासी अकॅडमीत राहून आपले भविष्य घडवू पाहतात. यापूर्वी  अनेक तरुण अकॅडमीद्वारे भरतीत यशस्वी झाले आहेत. सध्या पोलीस भरतीची मोठी जाहिरात राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. अनेकांना ही संधी खुणावत आहे. अनेक तरुणांनी यासाठी कागद पत्रांची जुळणी केली आहे. अनेकजण सैन्यदलातील भरतीसाठी इच्छुक आहेत. यासाठी खरी गरज असते शारीरिक क्षमता विकसित करण्याची, परंतु सध्या ॲकॅडमी बंद असल्यामुळे इच्छुक तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. काही युवक आपल्या गावी घरी शारीरिक क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शकाची गरज आहे.  

यासाठी पूरक असे संबंधित बौद्धिक मार्गदर्शन  गरजेचे आहे. ते घरी मिळणारी नाही  हे सर्व अकॅडमी मध्ये पूर्ण होऊ शकते. योग्य पद्धतीची नियमावली आखून सरकारने या अकॅडमी सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी अकॅडमी चालकांमधून तसेच विद्यार्थ्यांकडून होत आहे. आम्हाला आमची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी या अकॅडमी महत्वाची भूमिका बजावत आहेत. 

हेही वाचा - अकरा वर्षे उपेक्षित राहिलेल्या वीरमातेच्या न्यायाचा मार्ग खुला 

"भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना पूरक असणाऱ्या अकॅडमी चालवण्यासाठी सरकारने आदर्श नियमावली तयार करून त्या सुरू करण्यास परवानगी द्यावी."

- आनंदराव पवार, संचालक राजे छत्रपती अकॅडमी, फलटण

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: army and police recruitment students demands to government the academy open for study and practice in sangli