esakal | सातारा : सैन्य दलातील जवानांच्या सुटीस मुदत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : सैन्य दलातील जवानांच्या सुटीस मुदत वाढ

कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात जे जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्या संदर्भातील तक्रार असेल तर संबंधित विभागाला कळवावी.तसेच कोरोनाबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी व शंकांचे निरसनासाठी संपर्क करावा असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

सातारा : सैन्य दलातील जवानांच्या सुटीस मुदत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात युवक सैन्य दलातील विविध विभागात कार्यरत आहेत. त्यातील काही जवान सुटीवर आले आहेत. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभुमीर देशातील बहुतांश ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभुमीवर लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द अथवा स्थगीत करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातून लांब पल्ल्याची ठिकाणी जाणाऱ्या एसटीच्या बस रद्द करण्यात आल्या आहेत.

ज्या जवांनाच्या सुटी संपत आहेत. त्यांना त्यांचे कर्तव्य जागी पोहचण्यासाठी बस अथवा रेल्वेचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित जवांनी त्यांच्या त्यांच्या युनीट बरोबर संपर्क साधून या संदर्भात माहिती दिली.

दरम्यान सैन्य दलाने सुटीवर आलेल्या जवानांना 15 एप्रिलपर्यंत सुटी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबतची खात्री सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली. त्यानंतर संबंधित जवांनाना सुटीबाबतचा संदेश जवानांपर्यंत समाज माध्यमांद्वारे पोहचविण्यात आला. सुटीवर असलेल्या जवानांना आता 15 एप्रिलपर्यंत वाढ मिळाली आहे. त्यामुळे जवानांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वतःच्या गावाताच थांबावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

असे चालणार सातारा जिल्ह्यातील बॅंक, पतसंस्थांचे व्यवहार 
 

Coronavirus : शिक्षण विभाग म्हणते आता Whatsapp Schooling


सातारा :  जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना संसर्गाबाबत नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. या नियंत्रण  कक्षाचा व्हॉटस्अप क्रमांक 94030 94300 कार्यान्वीत करण्यात आला आहे. या क्रमांकावर  कोरोना संसर्ग संदर्भातील माहिती, उपचार त्या संबंधाने काही  माहिती असेल तर  संपर्क करावा तसेच मॅसेज, व्हॉटस्अप मजकुरास प्राथमिक स्वरुपाची माहिती दिली जाईल.

आपलं घर भरलेलं असावं पोरी..वेळ काही सांगून येत नाही...

कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात जे जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्या संदर्भातील तक्रार असेल तर संबंधित विभागाला कळवावी.तसेच कोरोनाबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी व शंकांचे निरसनासाठी शासकीय रुग्णालय, सातारा 02162- 38494,230051, जिल्हा परिषद आपत्कालीन क्रमांक 02162- 233025 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच राष्ट्रीय कॉल सेंटर क्र.91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र.020-26127394, टोल फ्री हेल्पलाईन क्र.104 वर  संपर्क साधावा.