esakal | असे चालणार सातारा जिल्ह्यातील बॅंक, पतसंस्थांचे व्यवहार

बोलून बातमी शोधा

असे चालणार सातारा जिल्ह्यातील बॅंक, पतसंस्थांचे व्यवहार

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (शनिवार) विविध आदेश काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

असे चालणार सातारा जिल्ह्यातील बॅंक, पतसंस्थांचे व्यवहार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व बँकानी व पतसंस्था यांनी उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी केले आहेत.

 या आदेशानुसार सर्व बँकांनी 31 मार्च पर्यंत फक्त रोख भरणा करणे व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावीत. तसेच बँकांनी पुरेसे कर्मचारी या कामासाठी नेमावेत जेणेकरुन ग्राहकांना बँकेच्या शाखेमध्ये कमीतकमी वेळ व्यतीत करता येईल. बँकांनी एका वेळेस जास्तीत जास्त चार ते पाच ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी द्यावी व प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना बँकेत आतमध्ये येण्यास परवानगी देऊ नये. दोन ग्राहकांमध्ये रांगेत एक मिटर इतके अंतर ठेवावे. सर्व बँकांनी आपआपल्या ग्राहकांना इतर वितरण पर्यायांचा म्हणजेच इंटरनेट बॅकींग, मोबाईल बँकींग व युपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशिन इत्यादी सुविधांचा वापर करण्याबाबत जनजागृती व आवाहन करावे. बँकेत ग्राहकांना काऊंटर पासून एक मीटर अंतर ठेवण्याबाबत सूचित करावे. सर्व बँकांनी आप आपल्या एटीएम, कॅश, चेक डिपॉझिट, पासबुक प्रिंटींग ईत्यादी सेवा असणाऱ्या मशीनची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच सर्व कर्मचाऱ्यांना व ग्राहकांना सॅनिटायझर, साबण व पाण्याने हात स्व्च्छ धुण्याची व्यवस्था करावी.

सातारा : कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व परमिटरुम बार ॲन्ड रेस्टोरंट, स्टार 3, 4 व 5 हॉटेल्स व त्यामधील बिअरबार आणि सर्व क्लब हे 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप, बिअर शॉपी, गावठी दारु दुकाने, इत्यादी सर्व प्रकारची दुकानेही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. कोणत्याही प्रकाराची दारु विक्री होणार नाही याबाबत उत्पादन शुल्क विभाग अंमलबजावणी करणार आहे.


सातारा :  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय (सब रजिस्ट्रार), सेतू (तहसील कार्यालय) व महा ई सेवा केंद्र आणि आधार केंद पुढील आदेश होईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. परंतु सातारा जिल्ह्यातील ज्या नागरिकांना दाखले अत्यावश्यक आहेत. सदर दाखल्याकरिता आवश्यक ती लागणारी कागदपत्रे त्यांनी स्कॅन करुन संबंधीत तहसील कार्यालयाच्या ई-मेलवर मुदतीत पाठविण्यात यावी. त्यामुळे सर्व नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने दाखले वितरीत करण्यात येतील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अतिश दाभोलकर यांना चिरमुले पुरस्कार जाहीर

सातारा :  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व व्हिडीओ गेम्स, व्हिडीओ पार्लर, टूरिंग टॉकीज, साहसी खेळांची ठिकाणे, वॉटर पार्कस व कला केंद्रे इत्यादी सर्व प्रकारची करमणुकीची व खेळाची केंद्रे आणि क्लब पुढील आदेश होईपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

आपलं घर भरलेलं असावं पोरी..वेळ काही सांगून येत नाही...

सातारा : चिलीवरुन आलेला युवक जिल्हा रु्गणालयात दाखल