जवानांचा हल्ला अन्‌ तोफगोळ्यांचा मारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

नगर - रणांगण अक्षरश: पेटले, रणगाड्यांनी तोफगोळ्यांचा मारा केला, अत्याधुनिक रायफलींचे गोळीबार, तोफगोळ्यांचे कानठाळ्या बसणारे आवाज येत राहिले, आकाशात हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्या. त्यातून भारतीय जवानांनी उड्या घेतल्या. शत्रूचा एक एक अड्डा शोधत त्यावर जबरदस्त हल्ला चढवला...

हा आहे नगरजवळील केके रेंज येथील रोमांचकारी युद्धसराव. आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल आणि मॅकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) यांचा यात सहभाग होता. भविष्यातील युद्धनीती आणि यंत्रांचा वापर यांचा वेध घेत जवानांनी लष्कराची संरक्षणसिद्धता आणि लढाऊ कौशल्याची साक्ष सोमवारी दिली. अर्जुन, टी ९०, टी ७२, टी ५५ या रणगाड्यांची शत्रूला टिपण्याची क्षमतादेखील सर्वांना पाहायला मिळाली.

हा अनुभव भयप्रद आणि रोमांचक तर होताच; पण भारतीय लष्कराच्या सामरिक आणि तांत्रिक सिद्धतेची, कौशल्याची ही प्रचितीदेखील होती.

Web Title: Army Training