
आनंद अप्पूगोळना ‘ईडी’कडून अटक; २५० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
बेळगाव : जिल्हा न्यायालय, जिल्हा ग्राहक न्यायालयातील दाव्यांच्या सुनावणीला सामोर जात असताना क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आनंद बाळकृष्ण अप्पूगोळ यांना ‘ईडी’ने (ED) आज (ता.६) अटक केली. त्याबाबतची माहिती ‘ईडी’कडून ट्विटद्वारे देण्यात आली आहे. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉड्रींग (PML) कायद्याचे उल्लंघन करत सुमारे अडीचशे कोटी रुपयांना ठकविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे ही कारवाई केल्याचे त्यात नमूद केले आहे.
क्रांतीवीर संग्गोळ्ळी राय्यण्णा आणि इतर नावांनी स्थापलेल्या या संस्थेच्या शाखा बेळगावसह राज्याथील विविध जिल्ह्यात आहेत. शाखेमध्ये मोठ्यासंख्येने गुंतवणूक व ठेवी लोकांनी ठेवल्या होत्या. पण, मुदत झाल्यानंतरही त्या परत केल्या नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार, ठेवीदार रस्त्यावर उतरले. संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्तालयापुढे निदर्शने करण्यात आली. याची गंभीर दखल घेण्यात आली आणि खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संस्थेकडून सुमारे अडीचशे कोटी रुपयांना ठकविल्याबद्दल जिल्हा न्यायालयात सुनावणीही सुरू आहे.
हेही वाचा: रस्त्याचे काम करणाऱ्या वाहनाने पादचाऱ्यास चिरडले; एकाचा जागीच मृत्यू
त्यासोबत या विरोधामध्ये ईडीकडे चौकशीसाठी तक्रार करण्यात आली होती. ईडीने याची दखल घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘पीएलएलए कायदा २००२’ अन्वये कारवाई करण्यात आल्याचे ‘ईडी’ने कळविले आहे. एकीकडे न्यायालयाकडून या संदर्भातील तपशिल आणि माहिती मागविण्यात आली आहे. दुसरीकडे ‘इडी’ने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
Web Title: Arrest Ed Anand Appugol Money Loundring Matter
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..