सातारा - बनावट नोटा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

सातारा : येथील बाजारपेठेत दोन हजार व पाचशे रूपयांच्या बनावट नोटा चालवणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या सहा सांशीयताकडून दोन हजाराच्या 1 हजार 315, पाचशे  रुपयांच्या 21 तर अर्धवट छापलेल्या 498 नोटा जप्त केल्या आहेत. या नोटांची बाजारपेठेत सुमारे 56 लाख 42 हजार 500 रूपये किंमत होते. 

दोनच दिवसांपूर्वी सांगलीत बनावट नोटा चालवणार्‍या गौस गब्बर मोमीन याला तसेच नोटा पुरवल्याप्रकरणी शुभम खामकर याला एलसीबीने अटक केली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी हि घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, याप्रकरणी गणेश भोंडवे (रा. मोळाचा ओढा), अनिकेत प्रमोद यादव (रा. नवीन एम.आय.डी.सी), अमोल अर्जुन शिंदे (रा. गडकर आळी), सुनील देसू (राठोड रा. मतकर कॉलनी), अमेय राजेंद्र बेलकर (रा. मोळाचा ओढा) आणि राहुल अर्जुन पवार यांना अटक करण्यात आली आहे. 

कोटेश्वर मंदिर परिसरात अनिकेत व अमोल हे दोघे बनावट नोटा चालवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट याना मिळाली मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या सहायक निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाने सापळा रचला.  त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

अनिकेत याच्याकडे 500 च्या 21, तर अमोलकडे 2 हजार रूपयांच्या 7 बनावट नोटा सापडल्या. गणेश भोंडवे याने या नोटा चालवण्यास दिल्याचे अनिकेतने सांगितले. त्यानंतर भोंडवे याच्या घरावर छापा टाकला. घराच्या झडतीमध्ये एका सॅकमध्ये 2 हजाराच्या 1 हजार 315, तसेच अर्धवट छापलेल्या 498 नोटा सापडल्या. भोंडवे याने दिलेल्या माहितीवरून सुनील देसु, अमेय बेलकर आणि राहुल पवार यांची नावे समोर आली. या सर्वांना ताब्यात घेतले गेले. त्यांच्याकडे 500 रुपयांच्या 26 लाख 54 हजार, तर 29 लाख 88 हजार रूपये किमतीच्या अर्धवट बनावट नोटा अशा एकूण 56 लाख 42 हजार 500 रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 
काल दिवस व रात्रभर हि कारवाई सुरू होती. यामध्ये एक लाख 33 हजार 500 रूपये किमतीची वाहने व मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. सर्वांवर विविध कलमान्वये शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: arrested a group who spreads duplicate currency in satara