आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कोल्हापूर - गर्भवती महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आज पतीस करवीर पोलिसांनी अटक केली. आरीफ पापालाल मुल्लाणी (वय 23, रा. अयोध्या कॉलनी, बोंद्रेनगर) असे त्याचे नाव आहे. पत्नी अलीशा आरीफ मुल्लाणी (19) हिने पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचे वडील रियाज बारगीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरीफला अटक केली. 

अलीशा आणि आरीफचा विवाह 22 जुलैला झाला. तेव्हा लग्नात मानापमान केला नाही. चारित्र्याच्या संशयावरून पती आरीफ आणि सासू रशीदा पापालाल मुल्लाणी, सासरे पापालाल मुल्लाणी यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्याला कंटाळून ती दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती. याबाबत हरविल्याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. तिचा शोध घेत असताना आज सकाळी तिचा मृतदेह पाडळी खुर्द येथील विहिरीत मिळून आला. पोलिसांनी याबाबत पंचनामा केल्यानंतर अलीशाचे वडील रियाज बारगीर यांनी पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आज सायंकाळी पती आरीफला अटक केली. आरीफ भाजीविक्रीचा व्यवसाय करतो. 

Web Title: The arrested man had motivate suicide case