रथातून सोमवल्लीचे आगमन

रथातून सोमवल्लीचे आगमन

अक्कलकोट  : शिवपुरी येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या षोडशी महासोमयागात दुसऱ्या दिवशी प्रायनीय इष्टीने दिवसाची सुरवात झाली. रथातून झालेल्या सोमवल्लीच्या आगमनाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या दिवशी यजमानांना दीक्षा विधीद्वारे अधिकार देण्यात आले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने आजपासून यज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला. दरम्यान, आज (मंगळवारी) प्रात: प्रवर्ग्य, उपसत, महावेदी पूजन, प्रवर्ग्य इत्यादी विधी पडले. सात दांपतीद्वारे मुख्य उत्तर्वेदीची गणेशपूजेसह पूजा करण्यात आली. 

दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे सोमकृय विधी ब्रह्मवृंदाने पार पाडला. त्यामध्ये भूतलावरील सर्वश्रेष्ठ वनस्पती म्हणून सोमलता खरेदी करण्यात येते. त्यात 10 पदार्थ दिले जातात. त्यासाठी खास इंद्ररथ तयार करण्यात आला होता. त्याचे पूजन आज करण्यात आले. त्यानंतर रथातून वाजतगाजत वैदिक मंत्राद्वारे सोमाला आणण्यात आले. सोम हा दिवस्थानी द्रव्य असून तो पृथ्वीवर अतिथी आहे म्हणून त्याची अतिथी इष्टीद्वारे पूजा करण्यात येते. दुपारनंतर प्रवर्ग्य विधीला सुरवात करण्यात आली. त्यामध्ये तप्त झालेल्या तुपामध्ये गाईचे तूप आणि शेळीच्या दुधाद्वारे आहुती देण्यात आली. यावेळी यज्ञस्थळी उंच ज्वाला पाहायला मिळाल्या. 

संध्याकाळी उपसद इष्टीचा विधी पार पडला. यावेळी इंद्राला आवाहन करण्यासाठी सुब्रह्मण्य नावाचे सामगान करण्यात आले. यज्ञ मंडपाच्या चारही बाजूला चारही शाखांतर्फे अग्निहोत्र करून भाविकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. सकाळी सूर्योदयावेळी आणि सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करून आजच्या दिवसाची समाप्ती करण्यात आल्याचे आनंद ब्रह्मे यांनी सांगितले. या विधीचे यजमानपद विकास आपटे (गोवा) आणि श्रीनिवास शर्मा सत्री (आंध्र प्रदेश) यांनी केले. 
या सोहळ्याला वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी भेट देऊन व्याहरती होम केला. मान्यवरांचे स्वागत व सत्कार विश्‍व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले. यावेळी अण्णा वाले, मोहन डांगरे, योगेश डांगरे, राहुल डांगरे, उपेंद्र पाठक, डॉ. धनराज नायडू, अरविंदभाई गोरडिया, चंदू राव, शामजी उपाध्याय, प्रथमेश कोठे, रामराव काळवंडे, बालाप्रसाद बियाणी, डॉ. गणेश थिटे, धनंजय वाळुंजकर, पवन कुलकर्णी, शर्मिला ब्रह्मे, शरयू खेर, प्रीती जोशी, वीणा दंडवते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com