चक्क... गायीला माणसांप्रमाणे कृत्रिम पाय...

artificial legs for cows, just like humans experimenting by Bharti Hospital's team
artificial legs for cows, just like humans experimenting by Bharti Hospital's team

सांगली (भिलवडी) - गायीला चक्क माणसांप्रमाणेच कृत्रीम पाय बसवण्याचा प्रयोग भारती हॉस्पिटलच्या टीमने यशस्वी केला आहे. माहिती अशी की, आमणापूर (ता. पलूस) येथील मारुती पाटील यांच्या नऊ वर्षाच्या गायीचा शेतात उडी मारताना अपघात झाला. पुढील उजवा पाय गुडघ्यापासून खाली मोडला.

गायीला कायमचे आले होते अपंगत्व 

श्री. पाटील यांनी उपचारासाठी पशुवैघकीय डॉक्‍टरांकडे नेले. मोडलेला पायाचा भाग निकामी झाल्याने तो काढुन टाकण्यात आला. त्यामुळे गायीला कायमचे अपंगत्व आले.
काहींनी पाय बसवण्यासाठी उपाय सुचवले. काहींनी वेगवेगळे पर्याय सुचवले. डॉक्‍टरांच्या वाटा धुंडाळून झाल्यावर श्री. पाटील यांनी शेवटचा प्रयोग म्हणुन भारती हॉस्पिटलशी संपर्क साधला. घडलेली हकीगत सांगितली. 

भारतीय हॉस्पिटलच्या टीमकडून यशस्वी प्रयोग

अस्थिरोग विभागातील कृत्रिम अवयव व दुरुस्ती केंद्राचे टेक्‍निशियन डॉ. संजीव चांगुणे व डॉ. सुशांत सुतार तात्काळ आमणापूर येथे आले. गायीची स्थिती पाहिली. कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला. सामग्री तयार केली. तासातच गायीला कृत्रिम पायाचे रोपण करण्यात आले. नालही मारण्यात आला. 

माणसांच्या डॉक्‍टरांनी करून दाखवलं

पाय बसवल्यानंतर शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडला. जे जनावरांचे डॉक्‍टर करू शकले नाहीत ते माणसांच्या डॉक्‍टरांनी करून दाखवलं अशी चर्चा सुरू आहे. भारती हॉस्पिटलचे विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, डॉ. सचिन शेट्टी, डॉ. केविन मकासरे उपस्थित होते.


शेतकऱ्यांचे पाळीव मुक्का जनावरांशी घट्ट नाते असते. त्याला इजा झाल्यावर घालमेल होते. त्यांच्यावर योग्य व वेळीच उपचार महत्वाचे असतात. त्यातून कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला. त्याचे समाधान वाटते.
-डॉ. संजीव चांगुणे, 
भारती हॉस्पिटल, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com