पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चित्रकार सरसावले...(व्हिडिओ)

kolhapur-Floods
kolhapur-Floods

कोल्हापूर : कोल्हापूर हे कलेचे माहेरघर आहे.छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कलेचा वारसा जपण्याचे काम केलेले आहे. याचाच प्रत्यय आणून कोल्हापुरातील चित्रकार  हे पूरग्रस्त मदतीसाठी सरसावले आहेत. चित्राचे प्रदर्शन मांडून त्यातून जो काही निधी उपलब्ध होईल तो‌ शालेय विद्यार्थ्यांना देण्याचा निश्चय केला आहे.

मुळात कलाकार हा संवेदनशील असतो. या चित्रकारानरांनी यापूर्वी कोल्हापुरातील अनेक चांगली चित्रे  काढली आहेत.  त्याचे मोल ही मोठे आहे. मात्र पुर परिस्थितीमध्ये  जी कोल्हापूरची अवस्था झाली ती पाहण्याजोगे नव्हती. म्हणून तब्बल १४०  चित्रकार एकत्र येऊन त्यांनी आपल्या चित्राचे प्रदर्शन मांडण्याचा निर्णय घेतला. त्यातून जो काही निधी उपलब्ध होईल तो‌ शालेय विद्यार्थ्यांना देण्याचा निश्चय केला आणि हे प्रदर्शन कोल्हापूर मध्ये भरवण्यात आले आहे.


कोल्हापूर आर्ट फाउंडेशन व कोल्हापूर चित्रकार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने रंग भावनांचे चित्र-शिल्प प्रदर्शन सध्या कोल्हापूर शाहू स्मारक याठिकाणी प्रदर्शनात भरवण्यात आले आहे. आपल्या कलेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना कलेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी या चित्रकारांनी पुढाकार घेतला आहे.

या प्रदर्शनामध्ये जी  चित्रे आहेत ती इतर वेळी 50 हजार, 60 हजार, एक लाख या किमतीला मिळतील अशी चित्रे चित्रकारांनी या प्रदर्शनामध्ये   सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत म्हणजे पाच हजार रुपये प्रति कलाकृतीची किंमत ठेवून  माणुसकीचे दर्शन दिले आहे .एकूण 110 कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 140 जणांचा सहभाग आहे. हे प्रदर्शन अकरा तारखे पर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत पाहण्यास ठेवण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये कोल्हापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे उद्घाटनाच्या दिवशी 24 चित्रांची विक्री झाली आहे. बाकीची चित्रांची विक्री होईलअसा आमचा विश्वास आहे -विजय टिपुगडे, चित्रकार

या प्रदर्शनामध्ये जी चित्रे ठेवली आहेत त्याची किंमत पन्नास हजाराच्या पुढची आहेत मात्र सर्वसामान्य परवडतील अशी चित्रे ठेवून चित्रकारांनी जी मदत केली  आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे -मुदिता बंदसोडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com