Ashadhi Ekadashi special trains from Miraj
esakal
मिरज : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तीन विशेष रेल्वेगाड्या जाहीर केल्या (Miraj to Pandharpur special train schedule) आहेत. नागपूर-मिरज, कोल्हापूर-कुर्डुवाडी आणि पुणे-मिरज या मार्गांवरील विशेष गाड्यांमुळे मिरज, सांगली, कोल्हापूर, पुणे, सांगोला, पंढरपूर परिसरातील भाविकांची सोय होणार आहे.