रंगत वाढणार! जारकीहोळी बंधू निवडणुकीत सक्रिय; कोणाला बसणार फटका? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

फायदा कुणाला होणार व फटका कुणाला बसणार हे निवडणूक निकालादिवशीच स्पष्ट होणार

रंगत वाढणार! जारकीहोळी बंधू निवडणुकीत सक्रिय; कोणाला बसणार फटका?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : सध्या विधान परिषद निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, निवडणूक विधान परिषदेची असली तरी जारकीहोळी बंधुंचीच चर्चा अधिक आहे. जिल्ह्यातील राजकारणात प्रभावी असणाऱ्या जारकीहोळी कुटुंबातील चार बंधू या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. त्याचा फायदा कुणाला होणार व फटका कुणाला बसणार हे निवडणूक निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे.

भाजपतर्फे विद्यमान सदस्य महांतेश कवटगीमठ पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्या पाठीशी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी आहेत. कवटगीमठ यांना प्राधान्य मतांव्दारे निवडून आणणार असल्याचे रमेश सांगत आहेत. कॉंग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या प्रचारार्थ केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आघाडीवर आहेत. त्यांना बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नेत्यांची साथ मिळत आहे. मात्र, प्रचाराची सूत्रे सतीश यांच्याकडेच आहेत.

हेही वाचा: गावसकरांचा आशीर्वाद अन् अय्यरनं पदार्पणात ठोकलं शतक

भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांत काटे की टक्कर होत असताना अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. उमेदवारी दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवून दिली आहे. यामुळे या निवडणुकीत जारकीहोळी बंधूंची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी जारकीहोळी बंधुंनी घेतली असली तरी बंधू लखन यांच्यासाठीही त्यांचे अंतर्गत प्रयत्न सुरु असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.

एकीकडे कवटगीमठ यांना निवडून आणण्याचे प्रतिज्ञा करतानाच कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव करणे आपले ध्येय असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे. यामुळे साहजिकच त्यांची दुसरी पसंती बंधू लखन यांच्यासाठी आहे. तर सतीश यांनी लखन यांच्यावर आरोप केल्यानंतरही ते आपले थोरले बंधू असल्याने त्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, अशी सूचक प्रतिक्रिया देऊन लखन यांनी त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: ...तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल - संजय राऊत

तर चौघे आमदार

विधान परिषद निवडणुकीत सबकुछ जारकीहोळी असे जणू समीकरण झाले आहे. लखन यांनी निवडणुकीत विजयी मिळवला तर जारकीहोळी कुटुंबातील चार बंधू आमदार होणार असून जिल्ह्यातील राजकारणात या कुटुंबांचा पुन्हा दबदबा वाढणार आहे.

loading image
go to top