अटलजी म्हणाले, "मी पैस खांबाच्या दर्शनाने पुनीत झालो”

सुनील गर्जे 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नेवासे : नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरास भेटी प्रसंगी अटलजी म्हणाले होते, "श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने व जगविख्यात ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाने पावन झालेल्या नेवासे नगरीच्या बंधु-भगिनींना माझा नमस्कार, मी पैस खांबाचे दर्शन घेऊन पुनीत झालो आहे.                    

नेवासे : नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरास भेटी प्रसंगी अटलजी म्हणाले होते, "श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने व जगविख्यात ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाने पावन झालेल्या नेवासे नगरीच्या बंधु-भगिनींना माझा नमस्कार, मी पैस खांबाचे दर्शन घेऊन पुनीत झालो आहे.                    

भारताचे माजी पंतप्रधान व भाजपाचे माजी अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी १ ऑगस्ट १९७९ रोजी ज्ञानेश्वरीचे उगमस्थान असलेल्या नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरास भेट देवून येथे असलेल्या 'पैस' खांबाचे दर्शन घेत खांबा जवळच दोन मिनिटे शांत बसले. मंदिरातून बाहेर येतांना बाहरील पाहीर्‍यांवर त्यांच्या समवेत आम्ही एक फोटो घरातला. अटलबिहारी वाजपेयी हे थोर युगपुरुषच होते. असे सांगत त्यांच्या नेवासे भेटीला उजाळा देत श्रीक्षत्रे नेवासे भेटीच्या आठवणी जागवल्या अटलजींचे नगर जिल्ह्यातील एक विश्वासू सहकारी व भाजपाचे माजी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिनकरराव ताके पाटील यांनी.

दिनकरराव ताके म्हणाले, "ऑगस्ट १९७९ मध्ये जनता पार्टीच्या सरकारमधून मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अटळ बिहारी वाजपेयी यांनी सर्वप्रथम जागर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. १ ऑगस्ट १९७९ रोजी त्यांचा जिल्हा दौरा निश्चित झाला. त्याच्या दौर्‍याचे नियोजन हे जेष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्याकडे होते. आदल्या दिवशी वाजपेयी औरंगाबाद येथे आल्यावर मीही मोटार सायकलवर त्यांना भेटायला गेलो. त्यांचा नगर दौरा मी पाहिल्यानंतर प्रमोद महाजन यांची रात्री आठ वाजता भेट घेवून अटलजींना नेवासे येथे संत ज्ञानेश्वर मंदिरास भेट देण्यासाठी आग्रह धरला मात्र ते राजी होत नसल्याने आमच्या चर्चेचा आवाज वाढल्याने ते अटलजींनी एकली व मला आत बोलावून घेतले. त्यांनी माझी विचारपूस करत काय म्हणाता असे विचारले त्यावर मी त्यांना नगर दौर्‍या दरम्यान नेवासे येथे ज्ञानेश्वर मंदिर भेटीला येण्याची विनती केली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता 'मला ज्ञानेश्वरीचे मुख्य उगस्थानाचे दर्शन गेण्यास मला आवडेल" असे सांगून नेवासे भेट निश्चित केली. त्यावेळी त्यांच्या समवेत जनता पार्टीचे तत्कालीन आरोग्यमंत्री नामदेवराव गाडेकर, जनता पार्टीचे अध्यक्ष रामभाऊ गावंडे, ज्येष्ठ नेते पुंडलिक दानवे हे होते.

१ ऑगस्ट १९७९ रोजी भल्या सकाळी मी माझजे सहकारी बाळासाहेब नळकांडे, ताटकाळी तहसिलदार थोरात व एका पोलिस हवालदार असे नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडका फाटा येथे आटलजींच्या स्वागतासाठी थांबलो. अटलजी आल्यावर आम्ही त्त्यांचे स्वागत केले. त्यांच्या समवेत प्रमोद महाजन,मंत्री नामदेव गाडेकर होते. मी त्यांच्या गाडीत बसून त्यांना थेट नेवासे येथे ज्ञानेश्वर मंदिरात घेवून गेलो. तेथे गेल्यावर अटलजींनी पैस खांबाचे दर्शन घेत दोन मिनिटे त्याच ठिकाणी शांत बसून राहिले. नंतर मला पैसे मागितले मी त्यांना शंभर रुपये दिल्यावर त्यांनी ते मंदिराच्या दान पेटीत टाकले. यावेळी विश्वस्त छबुराव कुलकर्णी यांच्या बरोबर त्यांनी चर्चाही केली.

मंदिराबाहेर आल्यावर समोरच असलेल्या पायर्‍यांवर आम्ही त्यांच्या नसावेत एक फोटो काढला. मंदिरापासून निघाल्यावर मी त्यांना नेवासे येथील मोहिनिराजांचे दर्शनास घेवून गेलो. दर्शन गेवून नगरकडे निघताना मला सोडण्यासाठी त्यांनी गाडी जिजामाता उद्यानाजवळ थांबवली त्यावेळी मी त्यांना विनंती केली की गाडीतून उतरून आपली भेट घेण्यासाठी उपस्थित नागरिकांना आपण भेटावे. अटलजींनी माझ्या विनंती नुसात आम्हाला काही वेळ दिला. मात्र नागरिकांनी त्यांच्या सभेचे आयोजन केले. सभा ठेवू नका असे अटलजी म्हणाले. मात्र नागरिकांचा उत्साहा पाहून त्यांनी तब्बल तीस मिनिटे भाषण केले.

अटलजी म्हणाले, "श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने व जग विख्यात ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाने पावन झालेल्या नेवासे नगरीच्या बांधी-भगिनींना माझा नमस्कार, मी पैस खांबाचे दर्शन घेवून पुनीत झालो आहे. यावेळी ज्ञानेश्वर मंदिरांच्या विश्वास्थांनी तत्यांना ज्ञानशावरी भेट दिली. त्यातील 9 हजार ओवयांचा माझ्या जीवनात निश्चितच बादल होणार आहे असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांचा नगर दौर्‍यावर जाण्यासाठि त्यांनी निरोप घेतला.

"अटलजींच्या निधनाने एक विद्वान संसदपटू, साहित्यिक, संवेदनशील पत्रकार तसेच आंतर्राष्ट्रीय दर्जाच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहे. त्यांच्या निधनाने पक्षाची व राष्ट्राचो मोठी हानी झाली आहे. मला अटलजींचा लाभलेला सहवास, एकलेल्या सभा व आठवणींनी माणसारखे भरून येते. असे सांगत भाजपाचे माजी राष्ट्रीय सदस्य दिनकरराव ताके पाटील यांनी थोर युगपुरुष अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

Web Title: atal bihari vajpayee visits dnyaneshwar temple of newase