अडीच वर्षांपासून दोघांचा एटीएम रकमेवर डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

सांगली - सांगली आणि परिसरातील तब्बल 17 एटीएम मशिनमध्ये रक्कम न भरता 3 कोटी 33 लाख 39 हजार रुपयांवर डल्ला मारणाऱ्या दोघांनी तब्बल अडीच वर्षांपासून हा उद्योग केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. चार वर्षांपूर्वी एटीएम घोटाळा झाल्यानंतरही बॅंकांचे दुर्लक्ष आणि पैसे भरण्याच्या पद्धतीतील त्रुटीमुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सायंटिफिक सिक्‍युरिटी मॅनेजमेंट सर्व्हीस प्रा. लि. या कंपनीकडे सांगली आणि जिल्ह्यातील काही बॅंकांच्या एटीएम मशिनमध्ये नोटा भरण्याचा ठेका आहे. कंपनीतील कर्मचारी लियाकत सर्फराज खान (वय 33, अमननगर, मालगाव रोड, मिरज) व अश्‍पाक अस्लम बैरागदार (वय 21, रेवणी गल्ली, मिरज) हे दोघेजण काही वर्षांपासून कार्यरत आहेत. दोघांकडे बॅंकातून रक्कम काढून ती एटीएम मशिनमध्ये भरण्याची जबाबदारी होती. दोघांनी 17 एटीएम मध्ये पैसे भरताना थोडी-थोडी रक्कम काढण्याचा उद्योग केला. बॅंकेतून रक्कम काढून ती मशिनमध्ये भरताना पूर्ण रक्कम भरल्याची एंट्री दोघेजण करत होते. प्रत्यक्षात त्यातील थोडी रक्कम काढून घेत होते. बॅंकेचे कर्मचारी किंवा अधिकारी रक्कम पूर्ण भरली की नाही हे तपासत नाहीत. एजन्सीकडे जबाबदारी असल्यामुळे रक्कम भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. दोघांनी याचाच फायदा उचलला. 

खान आणि बैरागदार तब्बल अडीच वर्षांपासून हा उद्योग सुरू केला. त्यामध्ये 3 कोटी 33 लाख 39 हजार रुपये परस्पर लंपास केले. बॅंकांनी एटीएम मध्ये भरलेल्या रकमेची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये तफावत जाणवली. त्यामुळे ठेका घेतलेल्या कंपनीला कळवले. अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर रकमेत अपहार केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार कंपनीचे अधिकारी मनमोहन जगदीश सिंग (नवी दिल्ली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

कसून चौकशी- 

तपास अधिकारी सहायक निरीक्षक सरोजिनी पाटील म्हणाल्या,""अटकेतील दोघांची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप त्यांनी अपहार केलेली रक्कम कोठे ठेवली हे सांगितले नाही. याप्रकरणी बॅंकातील जबाबदार अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाईल.'' 

Web Title: ATM fraud in sangli