आटपाडी नगरपालिकेसाठी स्वाभिमानी विकास आघाडी न्यायालयात जाणार

 नागेश गायकवाड
शनिवार, 28 एप्रिल 2018

आटपाडी (सांगली) : नगरपंचायत किंवा पालिकेचे वेध लागलेल्या आटपाडीकरांचा ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने मोठा भ्रमनिरास झाला आहे. यामुळे मागणी करून दखल घेतली जात नसल्याने स्वाभिमानी विकास आघाडीने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.                        

आटपाडी (सांगली) : नगरपंचायत किंवा पालिकेचे वेध लागलेल्या आटपाडीकरांचा ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने मोठा भ्रमनिरास झाला आहे. यामुळे मागणी करून दखल घेतली जात नसल्याने स्वाभिमानी विकास आघाडीने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.                        

आटपाडीची नगरपंचायत की नगरपालिका होणार याची गेली दोन वर्षे चचेॅचे गुऱ्हाळ सुरू आहे. या निर्णयाची आटपाडीकर चातकाप्रमाणे वाट पाहत होते. नगरपालिकेवरून भाजप आणि शिवसेनेत पडद्यामागे मोठे महाभारत घडले. लोकसंख्येच्या निकषात बसत नसल्यामुळे सेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी नगरपंचायतिसाठी प्रयत्न केले. चार दिवसात अध्यादेशची घोषणा केली. तर भाजप नेत्यांनी नगरपालिका करणारा असल्याचा दावा केला. या दोन्ही पक्षात यावरून राजकारण चांगलेच तापले होते.

दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मोठी ताकद लावली होती. आटपाडी ग्रामपंचायतीची निवडणूकच जाहीर झाली तरीही त्यांना आटपाडीचे नगरपालिका करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आटपाडीकरांचा मोठा भ्रमनिरास झाला. स्वाभिमानी विकास आघाडीने आटपाडीची नगरपालिका किंवा नगरपंचायत करण्यासाठी सह्यांची मोहीम राबविली होती तसेच विविध पातळीवर प्रयत्न केले होते. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यामुळे त्यांचे नेते भरत पाटील यांनी थेट न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: for atpadi nagarpalika swabhiman vikas aghadi goes to court