प्रार्थनेसाठी एकत्र जमलेल्या समुदायावर कोवाडमध्ये हल्ला

प्रार्थनेसाठी एकत्र जमलेल्या समुदायावर कोवाडमध्ये हल्ला

कोवाड - येथे देवाची प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमलेल्या समुदायावर घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यांत अकरा नागरिक जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना बेळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

आज सकाळी बाराच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोर काळे जॅकेट व तोंडाला रुमाल बांधून मोटारसायकलवरून आले होते. प्रार्थनेसाठी जमलेल्या समुदायावर हॉकी स्टिक, तलवार, सळ्या, चाॅपरने या हल्लेखोरांनी वार केले. परिस्थितीचे प्रसंगावधान साधत महिलांनी हल्लेखाेरांच्यावर चटणीची पुड फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे हल्लेखोर पसार झाले. 

हल्लेखोर तळगुळी मार्गे कर्नाटक हद्दीत पसार झाले. पण या हल्लेखोरांनी रस्त्यात एक प्रवासी व टम्पो चालकावरही हल्ला केला. तळगुळी येथे त्यांनी टेम्पो चालकावर हल्ला केला. तर हिंडाल्को येथे प्रवाशाला वाटेत अडवून तलवारीचे वार केले. त्या दोघांनाही बेळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com