मिरज : पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर हल्ला (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

  • धोकादायक इमारत पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर सायंकाळी दोघांचा हल्ला.
  • महापालिकेच्या चालकास मारहाण करून जेसीबीच्या  काचा फोडल्या.
  • महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनाही धक्काबुक्की
  • याप्रकरणी आलम अब्दुल काझी ( वय 55 ) आणि आमिर आलम काझी ( वय 25 ) या दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल.

मिरज - धोकादायक इमारत पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर आज सायंकाळी दोघांनी हल्ला केला. यावेळी महापालिकेच्या चालकास मारहाण करून जेसीबीच्या  काचा फोडण्यात आल्या. तसेच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

या संदर्भात सहाय्यक आयुक्त श्री.घोरपडे यांनी शहर पोलीसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आलम अब्दुल काझी ( वय 55 ) आणि अमिर आलम काझी ( वय 25 ) या दोघांविरुद्ध  सहाय्यक आयुक्तांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 

अमिर याने जेसीबीच्या चालकाला केबिनमध्ये घुसून मारहाण केली आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांनाही धक्काबुक्की केली. या घटनेमुळे या परिसरात बराच तणाव निर्माण झाला. ही कारवाई राजकीय हेतूने असल्याचा आरोप आलम काझी यांनी केला तर सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी 2015 पासून  या धोकादायक दुकान गाळ्यांबाबत महापालिका संबंधितांकडे पाठपुरावा करत आहे  त्यामुळे ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on municipal encroachment squad in Miraj