काकतीमध्ये लग्न सोहळ्यात राडा; 'साउंड सिस्टीम'वरुन पोलिस कॉन्स्टेबलवर लाठीहल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

काकती येथील लक्ष्मीनगर परिसरात शुक्रवारी विवाह (Marriage) समारंभ होता. त्या ठिकाणी साऊंड सिस्‍टीम लावली होती.
Belgaum Police
Belgaum Policeesakal
Summary

कॉन्स्टेबल मुशापुरी यांनी रात्री विवाहस्थळी साउंड सिस्टीम लावण्यासाठी परवानगी आहे का?, अशी विचारणा केली. याशिवाय रात्र झाली आहे. त्यासाठी साऊंड सिस्टिम बंद ठेवा, असे सांगितले.

बेळगाव : काकती येथील लक्ष्मीनगर परिसरात पोलिसाच्या (Belgaum Police) हातातील काठी बळजबरी काढून घेऊन पोलिस कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल (ता.१२) उघडकीस आली आहे. काकती पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष सदाशिव भंडारी (वय ३०, लक्ष्मीनगर, पहिला क्रॉस, काकती), राघवेंद्र श्रीशैल लोगावी (वय ३२, लक्ष्मीनगर पाचवा क्रॉस, काकती), वसीम मकानदार (काकती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर जखमी कॉन्स्टेबलचे नाव एल. एम. मुशापुरी आहे.

Belgaum Police
राष्ट्रीय पक्षी असलेल्या तब्बल 11 मोरांचा कृष्णा काठावर मृत्यू; वनखात्यानं घेतली गंभीर दखल, विषारी धान्य घातल्याचा संशय

माहिती अशी, काकती येथील लक्ष्मीनगर परिसरात शुक्रवारी विवाह (Marriage) समारंभ होता. त्या ठिकाणी साऊंड सिस्‍टीम लावली होती. मात्र, परवानगी घेतली नव्हती. कॉन्स्टेबल मुशापुरी यांनी रात्री विवाहस्थळी साउंड सिस्टीम लावण्यासाठी परवानगी आहे का?, अशी विचारणा केली. याशिवाय रात्र झाली आहे. त्यासाठी साऊंड सिस्टिम बंद ठेवा, असे सांगितले.

Belgaum Police
Kolhapur Politics : एकाच प्रसिद्धी पत्रकावर कट्टर विरोधक सतेज पाटील, धनंजय महाडिकांचे झळकले PHOTO, लोकांना बसला धक्का

मात्र, त्यातून वाद वाढला आणि पोलिस व संशयितांत शाब्दीक चकमक उडाली. या दरम्यान मुशापुरी यांच्या हातातील काठी काढून घेऊन संशयितांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामुळे सरकारी कामात अडथळा आणि विनापरवाना मंडप आणि साऊंड सिस्टिम लावल्याच्या आरोपाखाली तिघा विरोधात गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com