कोगनोळीत शेतकर्‍यांकडून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

रूंदीकरणात जागा देण्यास विरोध; प्राधिकरण अधिकाऱयांसोबत बैठक
कोगनोळीत शेतकर्‍यांकडून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
कोगनोळीत शेतकर्‍यांकडून महामार्ग रोखण्याचा प्रयत्नsakal
Updated on

कोगनोळी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण व कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. या उड्डाणपुलात येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाणार आहे. शेतकऱ्यांनी येथील उड्डाणपूल व अतिरिक्त जमीन संपादनाला विरोध दर्शविला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारयांसह वरिष्ठ अधिकारयांना दिले आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून येथील जमिनीचा सर्व्हे करण्याचे काम सुरू झाल्याने आक्रमक झालेल्या रयत संघटनेच्या शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २२) राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱयांनी तुर्त मध्यस्थी करून वातावरण शांत केले. आता शेतकऱयांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांसोबत बैठक होणार आहे.

घटनेचे गांभीर्य अोळखून यावेळी निपाणी मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बोलावून शेतकरी व अधिकारयांची बैठक घेतली. बैठकीत शेतकऱ्यांनी जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत सर्व्हे बंद करावा, अशी मागणी केली. यावेळी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलून याठिकाणी सुरू असलेले सर्व्हे बंद करण्याचे आश्वासन दिले.यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

कोगनोळीत शेतकर्‍यांकडून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
'राज्यपालांना लिहिलेलं पत्र अपरिपक्वतेचं लक्षण'

चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी, महामार्ग रुंदीकरणाच्या विषयावर शेतकऱ्यांच्या होणाऱय़ा नुकसानीबद्दल माहिती दिली. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वगळून कोणताही निर्णय घेऊ नये, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशारा दिला.

बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बेळगाव कार्यालयाचे व्यवस्थापक एस. एम. नाईक, कलमेश गुडीमनी, विठ्ठल मोरे, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, संजय काडगौडर, राजू गोरखानवर, एस. एम. गाडीवड्डर यांच्यासह पोलिस उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, संदीप चौगुले, आनंदा पाटील, युवराज माने, बाळासाहेब हादीकर, गब्बर शिरगुप्पे, पुंडलिक माळी, उमेश परीट, नारायण पाटील, मधुकर इंगवले, मन्सूर शेंडूरे, तानाजी जाधव, नागेश पाटील, मुनीर मुल्ला, राजू पाटील, प्रकाश वड्डर, संतोष चौगुले, विनायक चौगुले, रयत संघटना निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, विवेक जनवाडे, रयत संघटना निपाणी तालुका सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे यांच्यासह शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, कामगार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com