Sangli News : सांगलीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातून बाहेर आल्यावर परशराम बनसोडे यांनी अचानक बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले आणि....
parashram bansode
parashram bansodesakal
Updated on

सांगली - खटाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत अधिकारी संजय कुमार गायकवाड यांनी ग्रामपंचायतच्या कामात अनियमितता केली असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ आज परशराम बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने जिल्हा परिषदेत गोंधळ उडाला. विश्रामबाग पोलिसांनी तातडीने बनसोडे यांना ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com