बायपास विरोधात अंगावर पेट्रोल ओतून युवकाचा आत्मदहनचा प्रयत्न; बेळगावातील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

रस्त्याचे काम तातडीने बंद करा अन्यथा आम्ही स्वतःला काहीतरी करून घेऊ

बेळगावात बायपास विरोधात युवकाचा आत्मदहनचा प्रयत्न

बेळगाव : पोलिस बंदोबस्तात हलगा-मच्छे बायपासचे काम गुरुवारीही (11) हाती घेण्यात आले. याच ठिकाणी आकाश अनगोळकर या युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी आकाशचा भाऊ अमित याने देखील झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस आणि घरच्यांनी समजूत काढल्याने तो खाली उतरला.

हेही वाचा: 'डुकराशी कुस्ती' फडणवीसांच्या इंग्रजी वाक्यावर राऊतांचा मराठी बाणा

आकाश या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी पुन्हा या ठिकाणी काम सुरू केले. जेसीबी आणि विविध मशिनच्या सहायाने हलगा मच्छे बायपासचे काम सुरुच आहे. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले. रस्त्याचे काम तातडीने बंद करा अन्यथा आम्ही स्वतःला काहीतरी करून घेऊ असे पोलिसांना ठणकावून सांगितले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत काम न बंद ठेवण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे काम सुरूच ठेवण्यात आले.

यावेळी आपल्या सहा महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन एक महिला आंदोलन करताना दिसली. पोलिसांकडून आंदोलनस्थळी बसलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, काही शेतकरी महिलानी त्याला प्रचंड विरोध करत कोणत्याही परिस्थितीत काम न करण्याचा हट्ट धरला.

यावेळी उसावर जेसीबी फिरवला जात असताना एका शेतकऱ्याने जीसीबीमध्ये जाऊन अडवणूक केली. त्या शेतकऱ्याला पोलिसांनी बाजूला केले. त्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले. हलगा मच्छे बायपासचे मच्छे आवारात काम सुरू होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी जमले. मात्र पोलिसांकडून अडवणूक सुरुच होती.

loading image
go to top