पुलांचे ऑडिट पूर्ण; पण उपाय शून्य !

Reconstruction Of Bridge Is Neccessary Whose Structural Audit Is Completed
Reconstruction Of Bridge Is Neccessary Whose Structural Audit Is Completed

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख पुलांची सक्षमता व सुरक्षिततेची माहिती घेण्यासाठी बांधकाम विभागाने सुमारे 122 पुलांचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट' केले आहे. त्यातून ब्रिटिशकालीन 93 पुलांची दुरुस्ती व सुरक्षिततेचे उपाय करणे, तर काही ठिकाणी नवीन पुलांची बांधणी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी बांधकाम विभागाला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता आहे. सर्वाधिक रहदारी असलेल्या पुलांवर सुरक्षिततेची उपाययोजना करण्याबरोबर त्यांच्या डागडुजीवर भर द्यावा लागणार आहे.
 

जिल्ह्यातील सर्वच ठिकाणांशी दळणवळणाद्वारे संपर्क होण्यासाठी ब्रिटिशांनी विविध नद्या, ओढ्यांवर पूल बांधले. या पुलांची वयोमर्यादा 100 वर्षे ग्राह्य धरली होती. पण, ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांवरच मलमपट्टी करून तेच पूल, तेच रस्ते आजही वापरले जात आहेत.

जिल्ह्यात राज्य आणि जिल्हा मार्गाचे मोठे जाळे आहे. या मार्गांवर 93 ब्रिटिशकालीन पूल असून, त्यातील 13 पुलांची वयोमर्यादा 100 वर्षांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामध्ये सातारा तालुक्‍यात पाच, फलटण-चार, वाई-दोन, कऱ्हाड-एक, पाटणमधील एका पुलाचा समावेश आहे. या सर्वच पुलांवरून रहदारीचे प्रमाणही अधिक आहे. 

कोकणातील सावित्री नदीवरील पूल वाहून जाण्याच्या घटनेनंतर जुन्या तसेच मोठ्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यातील पुलांची माहिती घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील विविध मार्गांवरील तब्बल 122 पुलांची तपासणी व स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्णही झाले. त्यात काही पुलांची दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते.

त्यात ब्रिटिशकालीन तब्बल 93 पूल असून, त्यांचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट' करण्यावर भर दिला. त्यामुळे शंभरहून अधिक पुलांचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट'चे काम बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. यामध्ये सर्व पूल सुरक्षित असून, काही ठिकाणी तातडीने दुरुस्तीही पूर्ण केली आहे. आता उर्वरित ठिकाणच्या पुलांच्या दुरुस्तीसाठी व सुरक्षिततेच्या उपायांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. 

स्ट्रक्‍चरल ऑडिट पुर्ण

जिल्ह्यातील विविध ब्रिटिशकालीन पुलांची वयोमर्यादा लक्षात घेऊन सर्व पुलांचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट' करून घेण्यात आले. 30 वर्षांपेक्षा अधिक वयोमर्यादा झालेल्या पुलांची पाण्याखाली (अंडर वॉटर इन्स्पेक्‍शन) तपासणी केली. त्यानंतर आवश्‍यकता असलेल्या पुलांची पाण्याखालील पिलरची दुरुस्तीही करण्यात आली आहे. 

पाच तालुक्यांना पुलांचा धोकादायक

सध्या वाई तालुक्‍यातील सात ते आठ पूल, पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावरील पूल, महाबळेश्‍वर अंतर्गत पूल, माण, खटाव व खंडाळा तालुक्‍यांतील पुलांचा धोकादायक स्थितीतील पुलांमध्ये समावेश होत आहे. संगम माहुली व कऱ्हाड येथील पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने ही कामे रस्त्याच्या चौपदरीकरणावेळीच पूर्ण होणार आहेत. 


जिल्ह्यात 95.74 कोटींची गरज 

जिल्ह्यातील कमकुवत झालेल्या 35 पुलांची पुनर्बांधणी करण्यासाठी 56.70 कोटींची आवश्‍यकता आहे. रस्ता रुंदीकरण व नव्याने झालेल्या रस्त्यांवरील पुलांच्या दर्जोन्नतीसाठी आणि पुनर्बांधणीत 16 पुलांचा समावेश आहे. त्यासाठी 22.48 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. स्ट्रक्‍चरल दुरुस्तीसाठी 71 पुलांना 16.56 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी शासनाकडून उपलब्ध करून काही पुलांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. 


हे आहेत शंभरी पार ब्रिटिशकालीन पूल व त्यांची बांधणी केले वर्ष

कोयना पूल कऱ्हाड  1868
ओझर्डे पूल वाई 1914
जुना कृष्णा पूल कऱ्हाड  1939
केरा नदीवरील पूल गुहागर  1864
शिवकालीन कोयना तापोळा पूल 1658
नीराजवळील पूल 1925
वडूथमधील कृष्णा पूल 1845
संगम माहुलीतील कृष्णा पूल 1915
लोणंदजवळील पूल   
देऊरजवळील पूल  
वाढे वेण्णा पूल   
वर्ये येथील वेण्णा पूल  
वडूथ येथील वसना पूल  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com