सोलापूर - कचरा विलगीकरणासाठी स्वच्छ अॅागस्ट क्रांती मोहिम

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सोलापूर : घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा विलगीकरणासाठी स्वच्छ अॅागस्ट क्रांती मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम अॅागस्टअखेर चालणार असून, या कालावधीत उद्दीष्टपुर्ती करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाच शासनाची अनुदाने प्राधान्याने दिली जाणार आहेत. 

सोलापूर : घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा विलगीकरणासाठी स्वच्छ अॅागस्ट क्रांती मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम अॅागस्टअखेर चालणार असून, या कालावधीत उद्दीष्टपुर्ती करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाच शासनाची अनुदाने प्राधान्याने दिली जाणार आहेत. 

संपूर्ण देश अॅाक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी 2 अॅाक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियान मोहिम देशभर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) मोहिम राबविण्यात आली. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा 1 अॅाक्टोबर 2017 रोजी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत राज्यातील सर्व शहरे स्वच्छ करण्यात येणार आहेत. त्यासाठी 1 मे 2017
पासून राज्यात कचरा लाख मोलाचा ही मोहिम राबविण्यात येत आहे. 

घनकचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केल्याशिवाय प्रकल्प यशस्वी होत नसल्याचे दिसून आले आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यासंदर्भातील सवयी नागरिकांमध्ये बिंबवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी 1 ते 31 अॅागस्ट या कालावधीत स्वच्छ अॅागस्ट क्रांती मोहिम राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या कालावधीत 80 टक्के घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करणे व कचर्याचे घरोघरी जाऊन 100 टक्के संकलन करावे लागणार आहे. या कालावधीत उद्दीष्टपूर्ती करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाचा शासनाचे रस्ते अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान देण्यात येणार आहे.

असे असावे नियोजन
- घंटागाड्यातून रोज शहरातील 100 टक्के कचरा संकलित करावा.
- घंटागाड्यांचे वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे.
- विलगीकृत कचरा वाहतूक करताना एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी.
- अोल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग किंवा बायो-मिथेनायजेशन प्रक्रिया करावी.
 

Web Title: august kranti mohim for Garbage desalination in solapur