#Solapur : वादग्रस्त लेखकाच्या पुतळ्याला फासले काळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला धक्का देवू नये असा कळवळा जपणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. शत्रूंचा ही सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणत्याही राजकारण्याशी होवूच शकत नाही. 
- श्‍याम कदम, 
शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्यावतीने जुळे सोलापुरात कल्याण नगर येथील दत्त मंदिर परिसरात वादग्रस्त लेखक जयभगवान गोयल यांनी लिहीलेल्या पुरस्तकाविरोधात आंदोलन करण्यात आले. लेखकाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे काळे फासून व्यक्त करण्यात आला. 

हेही वाचा -  अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यामुळे लेखक गोयल यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तोंडाला काळे फासण्यात आले. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूरच्यावतीने करण्यात आली.

हेही वाचा - माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संतोष कापुरे, सनी पाटु, आशुतोष माने, संजय भोसले, अरविंद शेळके, अविनाश फडतरे, श्रीमंत पात्रे, सिताराम बाबर, अजित शेटे, संतोष माशाळकर, महेश भंडारे, वंदन वाघमारे, अमर मोळकेळी, नितिन व्हनमाने, सुलेमान पिरजादे, किशोर कदम, दत्तात्रय पवार, चंद्रकांत सपाटे, निवृत्ती भोसले, नवनाथ देठे, महेश बिराजदार, प्रशांत एक्काड, विरेश हुक्केरी, अजितकुमार जैन, भारत बडवने, रमेश झिपरे, सुशांत चव्हाण, संगमेश्वर मदगुणकी, संजय काशिद, अक्षय पात्रे, बालाजी काकडे, इलियास शेख आदी उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माचा सन्मान केला, सर्वांना समान हक्क दिले, रयतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला धक्का देवू नये असा कळवळा जपणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. शत्रूंचा ही सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणत्याही राजकारण्याशी होवूच शकत नाही. 
- श्‍याम कदम, 
शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Author's protest from Sambhaji Brigade