इचलकरंजीत ऑटो एक्‍स्पो प्रदर्शनाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

इचलकरंजी - 'सकाळ’च्या ‘ऑटो एक्‍स्पो’ प्रदर्शनास आज दिमाखात प्रारंभ झाला. प्रदर्शनात किमती व नावीन्यपूर्ण अशा चारचाकी वाहनांचा समावेश असल्याने शौकिनांनी दिवसभर गर्दी केली. उद्या (ता. ६)पर्यंत हे प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील केएटीपी मैदानावर विनामूल्य सुरू राहणार आहे. ऑटो क्षेत्रातील नामवंत ‘साई सर्व्हिस’ हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे, सतीश पवार, साई सर्व्हिसचे व्यवस्थापक राजू पाटील प्रमुख उपस्थित होते. ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) अरविंद वर्धमाने यांनी रोप देऊन मान्यवरांचे स्वागत केले. बातमीदार संजय खूळ यांनी ‘सकाळ’ने घेतलेल्या विविध उपक्रमांचा आढावा प्रास्ताविकात घेतला. सहायक व्यवस्थापक (विक्री) दत्तात्रय टोणपे यांनी आभार मानले. यावेळी सीनिअर एक्झिक्‍युटिव्ह (इव्हेंट) सूरज जमादार, बातमीदार पंडित कोंडेकर, राजेंद्र होळकर, वितरणचे मिलिंद फुले, पद्माकर खुरपे आदी उपस्थित होते. प्रदर्शन सकाळी अकरापासून रात्री आठपर्यंत विनामूल्य सुरू राहील.

नावीन्यपूर्ण वाहनांचे प्रदर्शन
प्रदर्शनात ३ ते ५० लाखांपर्यंतच्या वाहनांचा समावेश आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातील १३ नामवंत कंपन्या प्रदर्शनात सहभागी आहेत. दोन व चारचाकी वाहनांमधील अत्याधुनिक मॉडेल्स पहिल्याच दिवशी शौकिनांचे आकर्षण ठरले.

प्रदर्शनात सहभागी कंपन्या...
    साई सर्व्हिस प्रा. लि.  युनिटी मोटर्स
  ॲरॉन व्हील्स एलएलपी  माय ह्युंडाई
    श्राईन ऑटो प्रा. लि.  बादशहा बजाज
    एसएमजी निस्सान नेक्‍सा कोल्हापूर सेंट्रल
    मोक्ष मोटारसायकल एलएलपी
    मोक्ष मोटर बाईक कंपनी प्रा. लि.

Web Title: auto expo exhibition