मोहोळचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणेंना पोलिस महासंचालक सन्मान पदक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

मोहोळ : मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मान पदक जाहीर झाले असून येत्या 1 मे ला मान्यवरांच्या हस्ते सदरचे पदक प्रदान करण्यात येणार आहे.

मोहोळ : मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मान पदक जाहीर झाले असून येत्या 1 मे ला मान्यवरांच्या हस्ते सदरचे पदक प्रदान करण्यात येणार आहे.

पोलिस निरीक्षक कोकणे हे गेल्या पंचवीस वर्षापासून पोलिस सेवेत आहेत. त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद, गडचिरोली या विभागातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात उत्कृष्ट काम केले आहे. गडचिरोली येथे असताना सहा पुरुष व दोन महिला नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करावयास लावले. त्यांनी अनेक खून बलात्कार आदी गुन्ह्यांचा परिस्थितीजन्य पुराव्यावरून तपास करून, आरोपींना जेलची हवा खायला लावली आहे. त्यांनी केवळ गुन्हेगारा विरुद्धच नाही तर शेतकऱ्यांसाठीही  काम केले आहे.

त्यांनी गुन्हेगारा बरोबरच, राजकीय लोकांनाही शिस्त लावण्याचे काम केले आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात नेमणूक झाल्यानंतर नागरिकांचे प्रबोधन करून 51 गावात एक गाव एक गणपती ही योजना राबवली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तालुक्यातील नव्वद जणांना तडीपार केले आहे. कोकणे यांच्या नावावर 120 बक्षिसांचा तर वीस प्रशस्तीपत्र कांचा विक्रम आहे. हे सर्व करत असताना त्यांनी सहकारी पोलिस व नागरिक यांच्याशी सुसंवाद साधून, पोलीस व जनता यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे .या यशाबद्दल त्यांचा अनेक संस्था नागरिकांनी सत्कार केला आहे.

Web Title: award to Police inspector Suryakant Kokane at Mohol