जॉर्जियात साजरी झाली बाबासाहेबांची जयंती 

परशुराम कोकणे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सोलापूर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जॉर्जियामध्ये शिक्षणानिमित्त गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त कवितांचे सादरीकरण आणि विचारांची देवाणघेवाण झाली. 

देशप्रेम हे निरनिराळ्या कार्यातून व कृतीतून होत असते, मग ते देशात राहून असो की परदेशात. जॉर्जियामधील न्यू व्हिजन मेडिकल कॉलेज तिबिलिसी येथे शिक्षणासाठी असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी 14 एप्रिलला युरोपमधील तिबिलिसी जॉर्जिया येथे बाबासाहेबांची जयंती साजरी करून आपला आनंद व्यक्त केला. सोलापूरच्या संकेत साखरे यांनी प्रास्ताविक केले. परदेशातही आपली संस्कृती आपण जपावी, असे आवाहन त्यांनी केले. 

त्यानंतर अजिंक्‍य पाटील (सोलापूर), अकिब मुल्ला (कराड), संकेत कदम (कोल्हापूर) यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ऋषिकेश बंडगर यांनी बाबासाहेबांविषयी केलेली कविता सादर केली. संकेत कांबळे (कोल्हापूर) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेत कसा आणि किती अभ्यास केला हे सांगून, आपण त्यांचा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले. प्रणव हाके यांनी आपण आपली संस्कृती येथे परदेशात जपली पाहिजे. 

राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी, असे मत यावेळी व्यक्त केले. जय गावंडे यांनी आभार मानले. मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Babasaheb's birth anniversary was celebrated in Georgia