गोविंद निहलानी यांना बाबूराव पेंटर पुरस्कार 

गोविंद निहलानी यांना बाबूराव पेंटर पुरस्कार 

कोल्हापूर - येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ) महोत्सवाचा पडदा गुरूवारी (ता. 7) उघडणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन होणार असून ज्येष्ठ छायालेखक गोविंद निहलानी यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

याबाबतची माहिती आज कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, चित्रपट संकलक अभिजीत देशपांडे यांना चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्काराने गौरविले जाईल. महोत्सवाच्या सांगता समारंभात 14 फेब्रुवारीला या पुरस्काराचे वितरण होईल. येथील रिलायन्स मॉलच्या आयनॉक्‍स मल्टीप्लेक्‍समध्ये यंदाचा महोत्सव होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com