बापरे.. खुनानंतर गटारीत टाकून दिले बाळ! 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

रेल्वे स्थानक रस्त्यावरील घटना; गुन्हा दाखल 

सोलापूर : मोदी परिसरात गटारीत पाच ते सहा महिन्यांचे बाळ मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गळा दाबून खून केला आणि त्यानंतर बाळाचा मृतदेह गटारीत टाकल्याची नोंद सदर बझार पोलिसांत झाली आहे. 
डॉ. अंजली शिंदे यांनी खबर दिली आहे. पुरुष जातीचे अनोळखी पाच ते सहा महिन्यांचे बाळ मोदी पोलिस चौकी ते स्टेशन रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुमार चौकाजवळील विजयलक्ष्मी आर्केडसमोर रेल्वे भिंतीलगत गटारीत सापडले. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. गटारीच्या पाण्यात बाळ तरंगत होते. परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना कळविली. मृत बाळास शासकीय रुग्णालयात दाखल केले. अज्ञात व्यक्तीने बाळाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गटारीत टाकल्याची नोंद पोलिसांत झाली.

याप्रकरणी जर कोणाला काही माहिती असेल तर नागरिकांनी सदर बझार पोलिस ठाण्यात किंवा 9823924456 या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The baby thrown in the Drainage line after murder